गव्हाची चपाती खाण्याऐवजी एक महिना या पिठाची भाकरी खा, झटपट वजन कमी करा
आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्यासाठी लोकांना वेळ काढता येत नाहीए. त्यामुळे सकाळी नाश्त्याला फाटा मिळत आहे. तसेच दुपारी जे मिळेल ते खाल्ले जात आहे. आणि रात्री जड जेवण घतेल्याने पोटात चरबी साठत आहे. त्यामुळे वजन वाढल्याने अनेक आजार होत आहेत. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी महागड्या जिम जॉईंट करत आहेत. महागड्या डाएट आणि निरनिराळे उपाय करुनही वजन काही केल्या कमी होत नसल्याचे पुढे येत आहे.
परंतू यावरील उपाय तुमच्या किचनमध्ये लपलेले आहे. रोज तुम्ही गव्हाची चपाती खात असाल तर तिला बदला आणि त्याऐवजी ज्वारी किंवा नाचणीची भाकरी खात जा. त्यामुळे कोणताही जास्त व्यायाम न करता तुम्हाला वजन कमी करता येऊ शकते. चला तर पाहूयात वजन कमी करण्यासाठी कोणत्या पीठाची भाकरी खाणे योग्य आहे. वजन कमी करण्यासाठी ज्वारी की नाचणी उपयोगी असते ते पाहूयात…
ज्वारीची भाकरी – फिटनेस आणि एनर्जीचा पॉवर हाऊस म्हणजे ज्वारी आहे. जे लोक जिममध्ये जातात आणि वर्कआऊट करुन मसल्स बनवू इच्छीत आहेत त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी वरदान ठरू शकते.
प्रोटीनने भरपूर – ज्वारीत प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे स्नायूंना ताकद मिळते आणि स्नायूं कमजोर होण्यापासून वाचतात.
भूकेवर नियंत्रण – ज्वारीत फायबर मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे एक किंवा दोन भाकरी खाल्ल्यानंतर लगेच पोठ भरते. त्यामुळे अनेक तास तुम्हाला भूक लागत नाही.त्यामुळे विनाकारण काहीही खाण्याला लगाम लागतो.
पोटासाठी फायदेशीर – ज्वारी पचनासाठी चांगली असते. पोट फुगणे असा समस्यांपासून आपल्याला वाचवते.
कोणासाठी बेस्ट – जर तुम्हाला वजन कमी करण्या सोबतच शरीराला फिट आणि एनर्जेटिक राखायचे असेल तर ज्वारी तुमच्यासाठी योग्य आहे.
नाचणीची भाकरी – नाचणीची भाकरी खाल्ल्याने तुम्ही बारीक होऊ शकता. आणि हाडे देखील मजबूत होतात. आयुर्वेदात नाचणीला पौष्टीक गुणांचा खजाना म्हटले आहे.ही केवळ वजन कमी करत नाही तर शरीराला आतून देखील मजबूत बनवते.
कॅल्शियमचा राजा: नाचणीत दूधाहून अनेक पटीने कॅल्शियमचे प्रमाण जादा असते.
वजन कमी करण्यात मास्टर – नाचणीत ज्वारीपेक्षा जास्त फायबर असते. नाचणीची भाकरी खाल्ल्याने पोट असे भरते की तुम्हाला बराच काळ आणखी काही खाण्याची इच्छा होत नाही. ज्यामुळे कॅलरीचे इनटेक आपोआप कमी होते. वजन वेगाने कमी होते.
कोणासाठी आहे बेस्ट – तुम्ही जर केवळ बारीक न होता हाडांना देखील मजबूत करु इच्छीत असाल तर नाचणी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
अखेर कोणत्या पिठाची भाकरी बेस्ट – आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दीपांकर अत्रे यांच्या मते ज्वारी आणि नाचणी ही दोन्ही धान्ये चांगले पोषक आहेत. परंतू तुमचे लक्ष्य काय आहे ? जर वजन घटवणे आणि मसल्स वाचवणे हे तुमचे लक्ष असेल तर ज्वारीच्या भाकरीची निवड करावी.
जर लक्ष्य वजन घटवणे आणि हाडांना मजबूत करण्याचे असेल तर नाचणीची भाकरी तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. तर तुम्ही गव्हाच्या चपातीला काही काळ आराम द्यावा आणि हे दोन सुपरफूड भाकऱ्या ट्राय कराव्यात. काही आठवड्यातच तुम्हाला फरक जाणवेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List