भाजपने जैन समाजाला फसवले, आता धडा शिकवायची वेळ; नीलेश नवलखा यांचे खासदार मोहोळांवर आरोप
पुण्याचे महापौर असताना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी २०२० मध्ये माझे कायदेशीर बांधकाम दबाव टाकून बंद पाडले. आजही ते बांधकाम बंद पडलेले आहे. त्यांच्यामुळे मला अतोनात नुकसान झाले.
जैन समाजाने भाजपला भरभरून मते दिली. 5 मात्र, भाजपचे काही नेते आता कृतघ्न झालेले – आहेत. त्यांनी जैन समाजाच्याच पाठीत खंजीर खुपसला असून, याचा धडा त्यांना शिकवावा लागेल, अशी टीका बांधकाम व्यावसायिक नीलेश नवलखा यांनी केली. पुण्यातील जैन हॉ – स्टेल आणि मंदिराच्या जमिनीचा व्यवहार गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव येऊ लागल्याने मोहोळ यांचे कारनामे समोर येऊ लागले आहेत. शहरातील बांधकाम व्यावसायिक नीलेश नवलखा यांनी व्हिडीओ पोस्ट करत मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
नवलाखा म्हणाले, मोहोळ यांच्या कृत्याचा मी स्वतः एक बळी ठरलेलो आहे. २०२० मध्ये पुण्याचे महापौर असताना मोहोळ यांनी माझे कायदेशीर बांधकाम दबाव टाकून बंद पाडले. आजही ते बांधकाम बंद असून, मोहोळ यांच्यामुळे मला अतोनात नुकसान झाले. पण – मला असं वाटले की, हा एक अपवाद असेल.
नीलेश नवलाखा किंवा एका जैन व्यावसायिकाला त्रास देणे हा अपवाद असेल, असे मला वाटत होते. पण जेव्हा हे जैन हॉस्टेलचा विषय माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांडला आणि उचलून धरला, त्यावेळी माझ्या लक्षात आले की, मुरलीधर मोहोळ हे कदाचित सराईत गुन्हेगार आहेत की काय? कारण जैन हॉस्टेलमध्ये जमिनीचा व्यवहार केला. तो एक भाग आहे. मात्र, तिथे असलेले जैन मंदिरही व्यवसायासाठी गहाण ठेवले ही सर्वात जास्त लज्जास्पद गोष्ट आहे. असा निर्लज्जपणाचा कळस याआधी कुठल्याही राज्यकर्त्यांनी केला नव्हता. कुठल्याही खासदारांनी केला नव्हता. धंगेकर यांनी मांडलेले मुद्दे कायदेशीर व बरोबर आहेत.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना मोहोळ म्हणाले, बाणेर-बालेवाडी परिसरातील बालवडकर म्हणून शेतकरी त्यावेळी माझ्याकडे आले होते. या बिल्डरने खोटी मोजणी करून हा प्लॅन सँक्शन केल्याचे त्यांनी मला सांगितले. त्याच्यामध्ये काहीतरी अनियमितता आहे. काहीतरी चुकीचे घडले, असे त्यांनी मला सांगितले. मी जेव्हा प्रशासनाकडून माहिती घेतली, तेव्हा त्यापूर्वीच प्रशासनाने यावर स्टे दिलेला होता.
भाजप नेत्यांविरोधात बोलणाऱ्यांना त्रास दिला जातो
भाजप नेत्यांना कोणी काही बोलले की, ते देशद्रोही होतात. त्यांच्यावर आरोप लावले जातात. त्यांना त्रास दिला जातो. लोक बोलत नाहीत. पण मुद्दे बरोबर असल्याने या प्रकरणात मला बोलावेसे वाटले. धंगेकरांनी मांडलेल्या मुद्द्यांना माझे समर्थन असल्याचे नवलखा यांनी नमूद केले.
सॅलिसबरी पार्कमधील भिमाले यांचे प्रताप सर्वश्रुत
धंगेकर यांना उत्तर देताना माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी अतिशय खालच्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर ज्या भाषेचा वापर केला तो अतिशय चुकीचा व निषेधार्ह आहे. सॅलिसबरी पार्कमध्ये श्रीनाथ भिमाले यांनी किती जैनांना त्रास दिला, याच्या शेकडो तक्रारी तुम्हाला ऐकायला मिळतात. त्यांचे प्रताप सर्वांना माहीत आहेत. पर्वतीमध्ये एक लाख जैन लोक राहतात. भाजपला भरभरून मते देतात. मात्र, भाजपचे काही नेते कृतघ्न झालेले आहेत. त्यांनी जैन समाजाच्याच पाठीत खंजीर खुपसला आहे. याचा धडा त्यांना शिकवावा लागेल. मी मोहोळ, भिमाले यांचा निषेध करतो, अशी टीकाही नवलखा यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List