Mumbai News – मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द तर काही 20 मिनिटे उशिराने

Mumbai News – मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द तर काही 20 मिनिटे उशिराने

रेल्वे रुळ आणि सिग्नल दुरुस्तीच्या कामकाजासाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल 20 मिनिटे उशिराने धावतील. माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी / नेरूळ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान ट्रान्सहार्बरवरील ठाणे ते वाशी-नेरुळ आणि ठाणे ते पनवेल अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान शनिवारी रात्री 11.30 ते रविवारी पहाटे 4.45 वाजेपर्यंत अप आणि जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन जलद गाड्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे रात्री उशिराने धावणाऱ्या लोकल विलंबाने धावतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;