दिल्लीत हवेची गुणवत्ता आणखी खालावली; AQI 400 पार, दमाच्या रुग्णांमध्ये वाढ

दिल्लीत हवेची गुणवत्ता आणखी खालावली; AQI 400 पार, दमाच्या रुग्णांमध्ये वाढ

दिल्ली-एनसीआरमध्ये वायू प्रदूषण सातत्याने वाढत आहे. शनिवारी दिल्लीतील आनंद विहारमध्ये AQI पातळी ४१२ नोंदवली गेली, ज्यामुळे प्रदूषण पातळी गंभीर श्रेणीत आली आहे. अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब आहे. यामुळे श्वास घेण्यास त्रास, दमा आणि अ‍ॅलर्जिक ब्राँकायटिससारख्या आजारांच्या रुग्णांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. डॉक्टरांनी घराबाहेर पडताना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, वाढती प्रदूषण पातळी पाहता राज्यात GRAP 2 लागू करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक निर्बंध लादले आहेत. CAQM नुसार, दिल्लीतील सरासरी प्रदूषण पातळी २९६ नोंदवली गेली. त्यानंतर झालेल्या बैठकीत दिल्ली-एनसीआरमध्ये GRAP 2 निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला. GRAP-2 अंतर्गत, दिल्ली-एनसीआरमध्ये धूळ नियंत्रित करण्यासाठी स्वच्छता मोहिमा राबवली जाणार. तसेच आणि गर्दीच्या ठिकाणी किंवा धुळीचे प्रमाण जास्त असलेल्या भागात धूळ नियंत्रित करण्यासाठी स्मॉग गन बसवल्या जाणार. डिझेलवर चालणारे घरगुती जनरेटर वापरण्यास मनाई असेल आणि वीजपुरवठा खंडित झाल्यासच कारखान्यांना त्यांचा वापर करण्याची परवानगी असेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;