चॉकलेटमधून गुंगीचे औषध देत डॉक्टर महिलेवर अत्याचार

चॉकलेटमधून गुंगीचे औषध देत डॉक्टर महिलेवर अत्याचार

अहिल्यानगर येथे नोकरीच्या ठिकाणी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका 33 वर्षीय डॉक्टर महिलेला चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नराधम तरुणाने या कृत्याचा व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्याची आणि पीडितेच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच ‘गझवा-ए-हिंद’ करायचा आहे, असे म्हणत त्याने पीडितेवर लग्न करून धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही पीडितेने फिर्यादित केला आहे.

सावेडी परिसरात राहणाऱया पीडित डॉक्टर महिलेने याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी इरफान शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. बंगाल चौकजवळ, माळीवाडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिची आणि इरफान याची 2022 मध्ये एका रुग्णालयात ओळख झाली होती. त्यानंतर इरफानने पीडितेला वेगवेगळ्या कारणांनी धमकावण्यास सुरुवात केली. मार्च 2025 मध्ये त्याने माफी मागण्याच्या बहाण्याने पीडितेला खासगी ठिकाणी बोलावले. तेथे त्याने पीडितेला चॉकलेट दिले, जे खाल्ल्यानंतर तिला चक्कर येऊ लागली. याच संधीचा फायदा घेत इरफानने तिच्यावर अत्याचार केला व त्याचे चित्रीकरण केले. यानंतर त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर अनेकदा अत्याचार केले. तो सतत तिला लग्न करून धर्मांतर करण्यासाठी धमकावत होता. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पतीला सर्व हकीकत सांगितली आणि पोलिसांत धाव घेतली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलीस उपनिरीक्षक दळवी पुढील तपास करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;