चिपळूण कळंबस्ते रेल्वे फाटकात तांत्रिक बिघाड; वाहतूक ठप्प
कोकण रेल्वे मार्गावरील कळंबस्ते येथील रेल्वे फाटक पुन्हा तांत्रिक बिघाडामुळे अडकले. मंगळवार सुमारास (दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास) हे फाटक अडकल्यामुळे परिसरात ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण झाली.
या प्रकारामुळे स्थानिकांची आणि वाहनचालकांचे मोठे गैरसोय होत असून, तातडीने दुरुस्तीची मागणी केली जात आहे. शौकत मुकादम यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटले की, “जर दुरुस्ती अभावी अपघात घडला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी कोकण रेल्वे प्रशासनाची राहील.” मुकादम पुढे म्हणाले की, कळंबस्ते येथे रेल्वे फाटक असल्याने उड्डाण पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे, पण अद्याप ती पूर्ण झालेली नाही. या फाटकामुळे वाहनचालक आणि ग्रामस्थांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List