दही खाण्याची योग्य वेळ काय? 90 % लोकांना माहित नसेल, जाणून घ्या अन्यथा आजारी पडाल
आहारात नेहमी दही असावं हे आपल्या सर्वांना माहित आहे. कारण दही खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. पण दही खाण्याची योग्य वेळी आणि योग्य प्रमाण माहित असेल तर त्याचे नक्कीच दुप्पट फायदे आपल्याला मिळतात. आयुर्वेदात दही खाण्याच्या वेळेबद्दल आणि पद्धतीबद्दल काही नियम आहेत. त्यामुळे दही खाण्याची योग्य वेळ माहित असेल तर त्याचे फायदे होतात अन्यथा आरोग्यासाठी धाकादायक ठरते.
दररोज दही खाणे फायदेशीर आहे का?
दही हे प्रोबायोटिक्सचा एक उत्तम स्रोत आहे. त्यातील चांगले बॅक्टेरिया आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. भाजलेल्या जिऱ्यासोबत दही मिसळून खाणे पचनसंस्थेसाठी आणखी फायदेशीर ठरेल. यामुळे बद्धकोष्ठता किंवा अपचन यासारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. दही पोषक तत्वांनी समृद्ध असते आणि शरीरातील उर्जेची पातळी वाढवते. शिवाय, जर तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर नियमितपणे दही खाणे फायदेशीर आहे.
दही कधी खाऊ नये?
आयुर्वेदानुसार रात्री दही खाऊ नये. रात्री दही खाल्ल्याने सर्दी, खोकला, सायनस आणि कफ वाढू शकतो. कारण दह्यात थंडावा देणारे गुणधर्म असतात. रात्री शरीराचे तापमान कमी होते, ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. हिवाळ्यात, विशेषतः सकाळी किंवा रात्री दही खाणे टाळा. दह्यात जर भाजलेले जिरे पावडर घातली तर पचनासाठी नक्कीच फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त, दह्यात साखर किंवा मीठ घालल्याने त्याची चव तर वाढतेच पण त्याचे फायदेही दुप्पट होतात.
दही कोणी खाणे टाळावे?
दह्याचे अनेक फायदे असले तरी, काही आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी ते खाणे टाळावे. हृदयरोग आणि उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्यांनी दही खाण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. दही फार थोड्या प्रमाणात खाल्लं पाहिजे तसंच कमी कॅलरीजवालं दही खाणे फायदेशीर ठरते. जर तुम्ही घरी बनवलेले दही खात असाल तर कमी कॅलरीयुक्त दूध निवडा.
गोड दही टाळावे का?
अनेकांना गोड दही आवडते. हे अनेक प्रकारे हानिकारक असू शकते. काहींना दह्यात साखर, किंवा ब्राऊन साखर किंवा गूळ घालून खाणे आवडते. पण साखर किंवा गुळ घालून दही खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. त्यामुळे कॅलरीजची संख्याही वाढते.
साखर घालून दही खाणे हे जास्त वजन असलेल्या किंवा मधुमेही व्यक्तींसाठी हानिकारक ठरू शकते. अनेकांना दह्यात काळे मीठ घालणे देखील आवडते. उच्च रक्तदाब किंवा मूत्रपिंडाचा आजार असलेल्यांनी दह्यात मीठ घालणे टाळावे. ज्यांना मूलभूत वैद्यकीय स्थिती नाही ते दह्याचा आनंद घेऊ शकतात. ज्यांना त्याचे पौष्टिक मूल्य वाढवायचे आहे त्यांच्यासाठी दही घालून सॅलेड खाणे हा एक उत्तम पर्याय आहे.
दही खाण्याचे आरोग्य फायदे
दही खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.
पोटाचे आरोग्य आणि पचनशक्ती मजबूत होते.
केसांना दही लावल्याने कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
त्वचेवर दही लावल्याने त्वचा निरोगी राहते.
टॅनिंगची समस्या देखील दूर होते
तसेच दही वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List