लघवीचा रंग बदलतोय? समजून जा शरीर देतंय मोठा इशारा, लगेच डॉक्टरांकडे जा अन्यथा…

लघवीचा रंग बदलतोय? समजून जा शरीर देतंय मोठा इशारा, लगेच डॉक्टरांकडे जा अन्यथा…

Liver Disease : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. रोजची कामे संपवण्याच्या प्रयत्नात शरीराची किती हानी होत आहे? हे आपल्याला समजतही नाही. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो. एखादा अवयवजरी योग्य पद्धतीने काम करत नसली की त्याचा शरीरावर परिणाम दिसायला लागतो. शरीरातील यकृतचे काम तर फारच महत्त्वाचे आहे. यकृतात काही अडचणी असल्यास त्याचे काही संकेत तुम्हाला मिळतात. या संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

शरीरात यकृत फार महत्त्वाचे

यकृत अनेक कामे करते. अन्नाचे पचन करण्यात यकृत खूप उपयोगी पडते. सोबतच प्रोटिनची निर्मिती, रक्तनिर्मितीमध्येही यकृत महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो. शरीरातील मेटाबॉलिझमची गती कायम ठेवण्यातही यकृतची मोठी भूमिका आहे. मात्र हेच युकृत व्यवस्थितपणे काम करत नसेल तर तुमच्या शरीरात वेगवेगळे त्रास जाणवायला सुरुवात होते. यकृत खराब होण्यास सुरुवात झाल्यास तुमच्या लघवीचा रंग बदलायला लागतो.

लघवीचा रंग बदलल्यास घ्या काळजी

अमेरिकेतील आरोग्यविषयक संकेतस्थळ क्लिवलँडने याविषयी माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार लघवीचा रंग बदलणे हा यकृत खराब होण्याचा महत्त्वाचा संकेत असू शकतो. लघवी नेहमीच गडत पिवळ्या रंगाची येत असेल तर तुम्ही यकृतासंबंधीच्या चाचण्या करून घ्यायला हवी. यकृतात बिलिरुबीन नावाचा घटक असतो. या बिलिरुबीनवर यकृत वेगवेगळ्या प्रक्रिया करत असतो. मात्र यकृतात बिघाड झाल्यावर हेच बिलिरुबीन थेट रक्तात जमा व्हायला सुरुवात होते. त्यामुळे लघवीचा रंग गडत दिसतो. त्यामुळे लघवीचा रंग बदलत असेल तर डॉक्टरांकडे जायला हवे.

विष्ठेचा रंग बदलत असेल तर व्हा सावधान

तुमच्या विष्ठेचा रंग फिकट झालेला असेल तर ते यकृतात बिघाड झाल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे विष्ठेचा रंग फिकट होत असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. यकृतात पित्त तयार होते. याच पित्तामुळे विष्ठेला तपकिरी रंग येतो. यकृतात बिघाड झाल्यास पित्त निर्मितीत अडचण येते आणि विष्ठेचा रंग फिका होतो.

त्वचेवर येत असेल खाज तर व्हा सावध

तुमच्या त्वचेवर वारंवार खाज येत असेल तर वेळीच सतर्क झाले पाहिजे. कारण यकृतात बिघाड झाल्याचे हे संकेत असू शकतात. यकृतात बिघाड झाल्यास रक्तात बाईल सॉल्ट जमा व्हायला सुरुवात होते. हेच बाईल सॉल्ट नंतर त्वचेच्या खाली जमा व्हायला सुरुवात होते आणि त्वचेला खाज येते. अशी लक्षं दिसत असतील तर लगेच डॉक्टरांकडे जायला हवे.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Health Tips : आयुष्यात कधीच खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा लवकर दिसायला लागाल म्हातारे Health Tips : आयुष्यात कधीच खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा लवकर दिसायला लागाल म्हातारे
आरोग्याची वेळीच काळजी न घेतल्यास त्याचे भविष्यात फार गंभीर परिणाम दिसू शकतात. त्यामुळे काही पदार्थ खातानाही विचार करायला हवा. असे...
रात्री झोपण्यापूर्वी ही एक गोष्ट करा, तुमचा सर्व थकवा नाहीसा होईल, झोपही लागेल शांत
राज्यपालांचा खाजगी एलिफंटा दौरा; उद्या गेटवे-मांडवा, गेटवे -एलिफंटा दरम्यान सागरी वाहतूक बंद
शिवरायांच्या वेशातील तरुणाला विरोध, वसई भुईकोट किल्ल्यावर जाण्यापासून परप्रांतीय सुरक्षारक्षकांनी रोखलं
मुंबईतल्या मदनपुरा भागात इमारतीचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भिती
लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा, राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल
ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्याने वाद, तरुणीने व्हिडीओ शेअर करून सांगितला घटनाक्रम