दिवाळीचे पदार्थ जास्त खाल्ल्याने पोट बिघडलंय? तर तज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ उपायांचा करा अवलंब काही क्षणातच मिळेल आराम
दिवाळी हा अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक असलेला सण आहे आणि हा सण देशभर उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी सुरू झाली की प्रत्येकजण घराच्या बाहेर रांगोळी, दिवे आणि इतर विविध सजावटींनी आपली घरे सजवतात. संध्याकाळी लक्ष्मीची देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते. त्यानंतर फराळाचा आस्वाद घेतला जातो.
तसेच दिवाळी सण म्हंटल की घरोघरी फराळ बनवला जातो आणि गोड पदार्थ व मिठाई आणली जाते. अशावेळेस आपल्यापैकी अनेकजण चवीच्या मागे लागून तेलकट आणि गोड पदार्थ जास्त खातात. त्यामुळे दुसऱ्यादिवशी मात्र पोट बिघडते. तर तुमच्याही बाबतीत असे झाले तर तुम्ही आजच्या लेखात तज्ञांनी सांगितलेल्या या खास उपायांचा अवलंब करून या समस्येपासून काही क्षणातच आराम मिळवू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात.
तज्ञांनी सांगितले हे खास उपाय
दिवाळीत जास्त पदार्थांचे सेवन केल्यानंतर जर तुम्हाला तुमचे पोट जड वाटत असेल तर हे काही घरगुती उपाय आहेत जे तुमच्या शरीराला आराम देण्यास मदत करू शकतात.
जेव्हा जास्त खाल्ल्याने पोटाची समस्या सतावत असेल तर लगेच झोपू नका. थोडा वेळ वॉक करा असे केल्याने पचन सुधारते आणि पोटात गॅस तयार होत नाही.
कोमट पाण्यात लिंबू मध मिक्स करून हे पाणी प्यायल्याने विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. जर तुम्ही जास्त खाल्ले असेल तर हलके फायबरयुक्त पदार्थ जसे की सूप किंवा फळे खा.
जर तुम्हाला अॅसिडिटी आणि पोटफुगीचा त्रास होत असेल तर कोल्ड्रिंक्स, गोड पदार्थ आणि तेलकट पदार्थ सेवन करणे टाळा, कारण यामुळे पचनाच्या समस्या वाढू शकतात. गॅसची समस्या उद्भवल्यास आले किंवा ओव्याचे पाणी प्या. हे पाणी प्यायल्याने पोटफुगी आणि छातीत जळजळ यापासून देखील आराम मिळते. तुमच्या शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी दररोज पाण्याचे सेवन वाढवा.
या गोष्टी लक्षात ठेवा
तज्ञांच्यानुसार सणासुदीच्या काळात तुम्ही तुमच्या आहारात काही डिटॉक्स ड्रिंक्सचा समावेश करू शकता जेणेकरून तुमचे शरीर स्वच्छ आणि हलके राहते. प्रथम, सकाळी रिकाम्या पोटी कोमट लिंबू पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि योग्य पचनक्रिया वाढवते.
कोरफडीच्या गराचा रस किंवा काकडी आणि पुदिन्याचे डिटॉक्स वॉटर देखील शरीराला थंडपणा आणि हायड्रेशन राखण्यास मदत करते.
ग्रीन टी किंवा दालचिनीचे पाणी फॅटचे चयापचय वाढवते आणि जास्त खाल्ल्यानंतर पोटफुगी कमी करते.
नारळाचे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरात इलेक्ट्रोलाइट संतुलन देखील नियंत्रित ठेवते, विशेषतः जेव्हा तुम्ही जास्त मसालेदार किंवा गोड पदार्थ खाल्ले असतील. दिवसातून 1-2 वेळा हे डिटॉक्स ड्रिंक्स प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होण्यास आणि गॅस, छातीत जळजळ आणि जडपणा यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.
याव्यतिरिक्त, व्यायाम आणि स्ट्रेचिंग केल्याने शरीर सक्रिय ठेवण्यासाठी आणि पचनशक्ती मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. जर तुम्हाला जास्त खाल्ल्यानंतर अस्वस्थता येत असेल, तर तुम्ही घराभोवती थोडे फेरफटका मारू शकता. जास्त खाल्ल्यानंतर लगेच झोपल्याने गॅस आणि पोट दुखण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशातच जर अस्वस्थता कायम राहिली आणि तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर कोणत्याही आरोग्य समस्या असतील तर तुमच्या आहाराकडे बारकाईने लक्ष द्या. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही घरगुती उपाय करू नका. याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List