घरी केलेली खीर पाण्यासारखी पातळ होतेय? मग या टिप्स वापरा
सणा समारंभाला आपल्या घरात काही ना काही गोड धोड होत असते. परंतु अनेकदा काही छोट्या आणि साध्या सोप्या टिप्स माहीत नसल्याने, खीरीसारखे पदार्थ मात्र पातळ होतात. खीर घट्ट करण्यासाठी काही छोट्या टिप्स फाॅलो करणं हे खूप गरजेचं आहे.
चमकदार त्वचेसाठी आजपासूनच ‘हे’ पेय पिण्यास सुरुवात करा, जाणून घ्या
खीर घट्ट करण्यासाठी शिजवण्यापूर्वी तांदूळ किमान अर्धा तास आधी भिजत ठेवावा.
खीर मंद आचेवर शिजायला ठेवल्यास ती घट्ट व्हायला मदत होते.
खीर शिजवताना आपण त्यामध्ये थोडे ताजे क्रीम किंवा मावा घालावा.
खीर खूप पातळ असेल तर, त्यात थोडे तांदळाचे पीठ किंवा कॉर्नस्टार्च पेस्ट देखील घालू शकता.
खीर तळाशी चिकटू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहा.
खीर घट्ट आणि मलईदार बनवण्यासाठी शिजवताना थोडे ताजे क्रीम किंवा क्रीम घाला.
चमकदार त्वचेसाठी आजपासूनच ‘हे’ पेय पिण्यास सुरुवात करा, जाणून घ्या
साखर घातल्यानंतर खीर थोडी पातळ होऊ शकते. ती आणखी शिजवण्याऐवजी, गॅस बंद करा. थंड झाल्यावर खीर घट्ट होईल.
खीरीमध्ये पिस्ता, काजू यांची दरदरीत पेस्ट घालावी. यामुळे खीर घट्ट होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List