जेएनपीए बंदरातून 23 कोटींचा ई-कचरा जप्त, अॅल्युमिनियमच्या नावाखाली लॅपटॉप, सीपीयू आयात

जेएनपीए बंदरातून 23 कोटींचा ई-कचरा जप्त, अॅल्युमिनियमच्या नावाखाली लॅपटॉप, सीपीयू आयात

अॅल्युमिनियमच्या नावाखाली परदेशातून आयात केलेल्या 23 कोटी किमतीच्या ई-कचऱ्याचा साठा जेएनपीए बंदरातून जप्त करण्यात आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने शनिवारी ही कारवाई केली. बेकायदेशीरपणे मागवलेल्या चार कंटेनरमध्ये लॅपटॉप, सीपीयू, प्रोसेसर चिप्स आदी साहित्य होते. या प्रकरणी सूत्रधार असलेल्या सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय सुरक्षितता धोक्यात येते अशा प्रतिबंधित वस्तूंची भंगार म्हणून विल्हेवाट लावायची असतानाही बेकायदेशीर ई-कचऱ्याची हिंदुस्थानात आयात केली होती. चार कंटेनरमध्ये एकूण 17,760 जुने आणि वापरलेले लॅपटॉप, 11, 340 सीपीयू, 7, 140 प्रोसेसर चिप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटक जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत 23 कोटींच्या घरात असल्याची माहिती डीआरआय विभागाकडून देण्यात आली. या प्रकरणी सूत्रधार असलेल्या सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने तस्करीचे नियोजन, खरेदी आणि वित्तपुरवठा करण्यात सक्रियपणे सहभागी असल्याचे सांगितले. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पर्यावरणाला हानिकारक तरीही

सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या आणि प्रतिबंध असतानाही जेएनपीए बंदरात अॅल्युमिनियमच्या बनावट नावाखाली ई-कचरा आयात करण्यात आलेला होता. याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर डीआरआयच्या पथकाने चारही कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी केली. या तपासणीत अॅल्युमिनियम ट्रीट स्क्रॅप म्हणून बेकायदा ई-कचरा आयात केल्याचे उघड झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ब्रिटिश काळातील सविनय कायदेभंग चळवळीतील मुंबईच्या भूमिकेचा दृश्य प्रवास ब्रिटिश काळातील सविनय कायदेभंग चळवळीतील मुंबईच्या भूमिकेचा दृश्य प्रवास
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS), मुंबई आणि अल्काझी फाउंडेशन फॉर द आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “डिसओबीडीयंट सब्जेक्ट्स: बॉम्बे १९३०-१९३१”...
ब्रिटिश म्युझियमच्या ‘पिंक बॉल’ मध्ये ईशा, नीता अंबानींची भारतीय संस्कृतीची झलक
Bihar election 2025 – राजदची 143 उमदेवारांची यादी जाहीर; तेजस्वी यादव राघोपूरमधून रिंगणात, तीन जागांवर मैत्रीपूर्ण लढत
दिवाळीत शेअर बाजारात तेजीची आतीषबाजी! सेन्सेक्स 84,400 च्या पार तर निफ्टी 25,900 च्या वर
शांत झोप लागण्यासाठी महिन्यातून एकदा हे करायलाच हवं, वाचा
माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे निधन
पॅण्ट्री कर्मचाऱ्यांचे किळसवाणे कृत्य, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रेल्वेने केली कारवाई