हवेत असताना केबिनमध्ये आग, चीनमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; सर्व प्रवासी सुखरुप
हांग्झोहून सोलला जाणारे एअर चायनाचे विमान हवेत असताना केबिनमध्ये आग लागली. यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. एका प्रवाशाच्या बॅगेत लिथियम बॅटरी असल्याने ही आग लागली. विमानाचे शांघायमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. एअर चायनाने निवेदन जारी करत घटनेची पुष्टी केली. घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले.
हांग्झोहून इंचॉनला जाणाऱ्या फ्लाइट CA139 मध्ये एका प्रवाशाच्या हँडबॅगमधील लिथियम बॅटरीने अचानक पेट घेतला. क्रू मेंबर्सने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. विमानाचे शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. एअर चायनाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 9.47 वाजता विमानाने उड्डाण केले आणि दुपारी 12.20 वाजता इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List