धरणफुटीचा धोका ओळखणाऱ्या यंत्रणेला जर्मन पेटंट, शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे संशोधन

धरणफुटीचा धोका ओळखणाऱ्या यंत्रणेला जर्मन पेटंट, शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे संशोधन

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी धरणफुटीचा धोका ओळखून इशारा देणाऱ्या यंत्रणेविषयी केलेल्या संशोधनाला जर्मन पेटंट मंजूर झाले आहे.

भूगोल अधिविभागातील संशोधक शुभम तानाजी गिरीगोसावी, अधिविभागप्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर, इचलकरंजीच्या दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्स महाविद्यालयातील प्रा. परेश मट्टीकल्ली, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागातील डॉ. गणेश सुनील न्हिवेकर आणि विद्यापीठाच्या नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान स्कूलचे डॉ. तुकाराम डोंगळे यांनी या संदर्भातील संशोधन केले आहे.

या संशोधकांनी ‘अॅन इंटिग्रेटेड सिस्टीम फॉर दि डिटेक्शन ऑफ डॅम ब्रिचेस, अर्ली वॉर्निंग अँड इव्हॅक्युएशन असिस्टंन्स’ या शीर्षकाने आपले अभिनव संशोधन केले. या अत्याधुनिक प्रणालीद्वारे धरणफुटीचा धोका लवकर ओळखता येतो. त्याद्वारे नागरिकांना तत्काळ इशारा देणे आणि नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरास मदत करणे, याबाबी तातडीने करता येऊ शकतात. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात धरणभंग आणि पूर आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. या संशोधनाला जर्मन सरकारकडून पेटंट मंजूर झाले आहे.

प्रकल्प संशोधक शुभम गिरीगोसावी यांनी या मॉडेलचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रात्यक्षिक सादर केले असून, या अभिनव प्रणालीला विविध तज्ज्ञ संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यासाठी त्यांना दोन राष्ट्रीय आणि एक आंतरराष्ट्रीय, असे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ब्रिटिश काळातील सविनय कायदेभंग चळवळीतील मुंबईच्या भूमिकेचा दृश्य प्रवास ब्रिटिश काळातील सविनय कायदेभंग चळवळीतील मुंबईच्या भूमिकेचा दृश्य प्रवास
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS), मुंबई आणि अल्काझी फाउंडेशन फॉर द आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “डिसओबीडीयंट सब्जेक्ट्स: बॉम्बे १९३०-१९३१”...
ब्रिटिश म्युझियमच्या ‘पिंक बॉल’ मध्ये ईशा, नीता अंबानींची भारतीय संस्कृतीची झलक
Bihar election 2025 – राजदची 143 उमदेवारांची यादी जाहीर; तेजस्वी यादव राघोपूरमधून रिंगणात, तीन जागांवर मैत्रीपूर्ण लढत
दिवाळीत शेअर बाजारात तेजीची आतीषबाजी! सेन्सेक्स 84,400 च्या पार तर निफ्टी 25,900 च्या वर
शांत झोप लागण्यासाठी महिन्यातून एकदा हे करायलाच हवं, वाचा
माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे निधन
पॅण्ट्री कर्मचाऱ्यांचे किळसवाणे कृत्य, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रेल्वेने केली कारवाई