जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, पाच महिन्यांनंतर उघडले दरवाजे

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, पाच महिन्यांनंतर उघडले दरवाजे

जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेला मुरुड-जंजिरा किल्ला अखेर तब्बल पाच महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. पुरातत्व खात्याने या किल्ल्याचे दरवाजे उघडल्याने पर्यटक आणि प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बोट चालकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान लवकरच दिवाळीची सुट्टी लागणार असल्याने बच्चेकंपनीला ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्याची संधी मिळणार आहे.

25 मेपासून जंजिरा किल्ल्याचे दरवाजे दरवर्षी बंद करण्यात येतात. किल्ला भर समुद्रात असल्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर किल्ल्यावर प्रवेश करता येत नाही. खवळलेला समुद्र, उंचच उंच लाटा आणि वेगवान वारा यामुळे या किल्ल्यात प्रवेश धोकादायक असतो. पावसाळ्यामध्ये या किल्ल्यामध्ये झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली असतात. दरवर्षी या झाडाझुडपांची पुरातत्व विभागातर्फे साफसफाई केल्यानंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात येतो. यंदाही ही झाडेझुडपे काढण्यात आली आहेत. या वर्षी सतत पडणाऱ्या पावसामुळे साफसफाई करण्यास सतत अडथळे आल्याने हा किल्ला पाच महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला, अशी माहिती पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी दिली.

25 रुपये शुल्क

जंजिरा किल्ला पाहण्यासाठी १५ वर्षांच्या खालील मुलांना शुल्क माफ करण्यात आले आहे. तर 16 वर्षांवरील पर्यटकांना 25 रुपये आकारण्यात येणार आहेत. ऑनलाइनची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली असून यंदाच्या दिवाळी सुट्टीत महाराष्ट्राच्या विविध भागातून पर्यटक तसेच विद्यार्थी येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;