सोने ही गुंतवणूक नसून विमा, झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांचे मत
सोने ही गुंतवणूक नसून आर्थिक जोखमीच्या काळातील विमा आहे, असे मत झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी व्यक्त केले आहे. अलीकडे सोन्याच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ हा एक धोक्याचा इशाराच आहे, असेही ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांनी अलीकडेच एक लेख लिहिला आहे. त्यात जागतिक बाजारात मोठय़ा घसरणीची शक्यता वर्तवली आहे. त्या लेखावर वेम्बू यांनी सोशल पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकी शेअर बाजारात मोठा बुडबुडा तयार झाला आहे. त्यातून 2008-09 सारख्या मंदीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शेवटी अर्थव्यवस्था विश्वासावर चालते. कर्जाची प्रमाण मर्यादेबाहेर गेले की विश्वास डळमळतो. परिणामी लोक सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करतात, असे वेम्बू म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List