विटय़ात 20 लाखांचा गुटखा जप्त

विटय़ात 20 लाखांचा गुटखा जप्त

अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणाऱया तरुणाला विटा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 20 लाख 65 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

हृषीकेश चंद्रकांत कदम (वय 22, रा. दारुज, ता. खटाव, जि. सातारा असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

गुहागर ते विजापूर रस्त्यावरून एका बोलेरो पिकअपमधून विटय़ाच्या दिशेने अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मात्र, इशारा देऊन पिकअप गाडी थांबली नाही. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करत पिकअप रोखली. त्यावेळी गाडीमध्ये द्राक्ष भरण्याच्या कॅरेटमध्ये सुगंधित तंबाखू, पानमसाला व गुटखा असल्याचे आढळून आले. चालक हृषीकेश चंद्रकांत कदम याला ताब्यात घेतले आहे. पिकअपमधील 39 पोत्यांतील 8580 पॅकेट व वेगवेगळ्या पोत्यांमध्ये विमल पान मसाल्याच्या पुडय़ा व 7 लाख रुपये किमतीची पांढऱया रंगाची बोलेरो पिकअप असा एकूण 20 लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर अधिक तपास करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;