शिवसैनिकांनी नेटाने काम करावे – वरुण सरदेसाई

शिवसैनिकांनी नेटाने काम करावे – वरुण सरदेसाई

महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे.  तुम्ही नेटाने काम करत प्रचाराचा वेग वाढवा. सांगलीत आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला.

सांगली येथील हॉटेलमध्ये आयोजित शिवसेना पदाधिकारी बैठकीत वरुण सरदेसाई यांनी सांगली मतदारसंघातील प्रचार नियोजनाचा आढावा घेतला.  यावेळी त्यांनी पदाधिकाऱयांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. यावेळी सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील, संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभुते, अभिजित पाटील, जिल्हा संघटक बजरंग पाटील, दिगंबर जाधव, उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी ऋषिकेश पाटील, गुंठेवारी सेनेचे चंदन चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वरुण सरदेसाई म्हणाले, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजेत उमेदवारीची घोषणा केल्यापासून आम्ही कामाला लागलो आहोत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे ताकदीने मैदानात उतरले आहेत. कार्यकर्ते कामात आहेत. येथे मित्रपक्षांची आम्हाला मदत होणारच आहे. चंद्रहार पाटील दोन दिवसांत गावभेटी सुरू करणार असून, यश नक्की मिळेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;