कुख्यात गुंड नीलेश घायवळसह कुटुंबीयांची 10 बँक खाती गोठवली
कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्यासह त्याच्या कुटुंबीयांची 10 बँक खाती गोठवण्यात आली आहेत. बँक खात्यात 38 लाख 26 हजार रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये दहशतीसह दादागिरी करणाऱ्या टोळ्यांचे आर्थिक स्रोत बंद करून त्यांना वठणीवर आणण्याचा पोलिसांनी सपाटा लावला आहे. यापूर्वी कुख्यात बंडू आंदेकर टोळीचीही बँक खाती गोठविण्यात आली होती.
पुणे पोलिसांनी विविध बँक प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला होता. त्याअनुषंगाने कुख्यात गुंड नीलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांतील 10 जणांची बँक खाती असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार संबंधित बँक प्रशासनाने नीलेश घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती नीलेश घायवळ, कुसुम घायवळ, पृथ्वीराज इंटरप्रायझेस ही बँक खाती गोठवली आहेत. 10 बँक खात्यांतील 38 लाख 26 हजार रुपये फ्रीज करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांच्या एनओसीशिवाय आता संबंधितांना रक्कम काढता येणार नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List