गाण्याच्या कार्यक्रमात नाचताना स्टेज तुटला, मिंधे गटाच्या आमदारासह कार्यकर्ते खाली पडले
सध्या देशभरात नवरात्रीची धूम सुरू आहे. नवरात्रीनिमित्त मिंधे गटाचे भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वतीने गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान आमदार भोंडेकर आणि त्यांचे कार्यकर्ते स्टेजवर नाचत असतानाच स्टेट तुटला. यात आमदार भोंडेकरांसह त्यांचे कार्यकर्ते खाली पडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पवनी शहरात भोंडेकर यांच्या वतीने शहनाज अख्तर यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गाण्याचा कार्यक्रम सुरू असताना आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते स्टेजवर चढून नाचू लागले. नाचत असतानाच अचानक स्टेज तुटला आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह काही कार्यकर्ते खाली कोसळले. यात काहींना मोठी दुखापत झाली असल्याचं बोलले जात आहे. तर आमदार यांना किरकोळ इजा झाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List