मेटा, एक्स, गुगल आणि न्यूज पोर्टल्सना मलबारच्या पाकिस्तानी इन्फ्लुएंसरसोबतच्या पोस्ट हटवण्याचे आदेश

मेटा, एक्स, गुगल आणि न्यूज पोर्टल्सना मलबारच्या पाकिस्तानी इन्फ्लुएंसरसोबतच्या पोस्ट हटवण्याचे आदेश

एका पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएंसरशी संबंधित असल्यामुळे ऑनलाइन पोस्ट्समध्ये मलबार ग्रुपला पाकिस्तानसोबत जोडण्यात आले होते. यानंतर, कंपनीने कोर्टात धाव घेऊन तात्पुरते संरक्षण मिळवण्याची मागणी केली.

मलबारने कोर्टात सांगितले की, त्यांनी ब्रिटनच्या बर्मिंगहॅम शहरात एका नवीन शोरूमच्या प्रमोशनसाठी ‘जेएबी स्टुडिओज’ (JAB Studios) या कंपनीला इन्फ्लुएंसर्स शोधण्यासाठी काम दिले होते. यापैकी एक मुख्य इन्फ्लुएंसर म्हणून जेएबीने पाकिस्तानी इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर अलीश्बा खालिदची निवड केली होती. खालिद ब्रिटनमध्ये राहते आणि तिच्यावर हिंदुस्थानच्या सर्जिकल स्ट्राइकच्या विरोधात सार्वजनिक टीका केल्याचा आरोप आहे.

मलबारने कोर्टात स्पष्ट केलं की, खालिदसोबतचा करार ‘पहलगाम हल्ल्या’पूर्वी झाला होता आणि तिच्यासोबत करार करताना तिच्या कनेक्शनबद्दल किंवा तिच्या जुन्या सार्वजनिक कमेंट्सबद्दल कंपनीला काहीच माहिती नव्हती. कंपनीने सांगितलं की, बर्मिंगहॅमच्या शोरूममध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा करार प्रामाणिक हेतूने करण्यात आला होता.

हा करार जाहीर झाल्यावर, अनेक लोकांनी ऑनलाइन पोस्ट्सद्वारे मलबारला पाकिस्तानशी जोडण्याचा प्रयत्न सुरू केला. कंपनीने कोर्टाला सांगितलं की, अशा ४४२ लिंक्स (URLs) त्यांना मिळाल्या आहेत आणि त्या मानहानिकारक आहेत. या पोस्ट्समुळे मलबार ‘पाकिस्तानचा समर्थक’ आहे, असं चित्र निर्माण होत आहे. मलबारच्या मते, सणासुदीच्या काळात त्यांचा व्यवसाय खराब करण्यासाठी काही स्पर्धकांनी जाणीवपूर्वक या पोस्ट्स पसरवल्या आहेत.

न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी मलबारला तात्पुरतं संरक्षण दिलं. कोर्टाने ऑनलाइन पोर्टल्स आणि सोशल मीडिया साइट्सना त्या इन्फ्लुएंसरसोबतच्या संबंधांबद्दलची कोणतीही मानहानिकारक पोस्ट फॉरवर्ड करण्यास मनाई केली. कोर्टाने सांगितलं की, मलबारने जेव्हा विशिष्ट लिंक्स (URLs) पुरवल्या, तेव्हा या प्लॅटफॉर्म्सनी त्या पोस्ट्स काढून टाकाव्यात.

कोर्टाने मलबारला त्या लिंक्सचे तपशील प्लॅटफॉर्म्सना देण्यास सांगितलं आहे, जेणेकरून त्या पोस्ट हटवता येईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चूक मान्य; बंदी उठवा! चूक मान्य; बंदी उठवा!
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा हिंदुस्थानी कुस्तीपटू अमन सहरावतने आपली चूक स्वीकारली असून, राष्ट्रीय कुस्ती महासंघाला (डब्ल्यूएफआय) आपल्यावरील एक वर्षाच्या बंदीचा...
उद्यापासून शताब्दी क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ
Digital Depression : डिजिटल क्रांतीमुळे डिप्रेशनचा धोका, हातातला मोबाईल जीवघेणा ठरू शकतो का?
लग्नाच्या 5 वर्षांनंतर पाळणा हलला, महिलेने एक-दोन नव्हे… ‘इतक्या’ बाळांना दिला जन्म
वारंवार हात धुतल्याने आपण आजारी पडू शकतो? शरीराला हे त्रास होऊ शकतात
डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? आहार कसा असावा?
मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी; दिवाळी, छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी