राज्यात अतिवृष्टीने शेतकरी कोलमडून पडला असताना, बँकेकडून कर्जवसुलीच्या नोटीस आल्याच कशा? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

राज्यात अतिवृष्टीने शेतकरी कोलमडून पडला असताना, बँकेकडून कर्जवसुलीच्या नोटीस आल्याच कशा? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल २४ जिल्ह्यांतील १३७ तालुके बाधित झाले आहेत. केवळ सप्टेंबर महिन्यातील शेती पिकांचे नुकसान २६ लाख हेक्टरवर गेले आहे. अशा वेळी बँकेकडून शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीची नोटीस कशी काय देण्यात आली? सरकार झोपा काढत आहे का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

अहिल्यानगर, बीड, जालना, सोलापूर, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ हे जिल्हे सर्वाधिक बाधित झाले आहेत. खरीप हंगामातील सुमारे ५२ लाख हेक्टरवरील पीक पाण्यात गेले असून, खरीप हंगाम तर हातातून निसटला आहेच, परंतु रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी शेतजमीन खरवडून गेल्याने शेतकरी रब्बी हंगामापासून देखील वंचित राहणार आहे.अशा वेळी बँकेकडून कर्ज वसुलीच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. सरकारने बँकांना का सूचना दिल्या नाही? शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली थांबली पाहिजे अस वडेट्टीवार म्हणाले.

सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घ्यावेत. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. म्हणूनच त्यांना लवकर पुन्हा उभं करण्यासाठी दिवाळीपूर्वीच भरीव मदत केली पाहिजे. अजूनही केंद्राकडून पाहणी करायला पथक आलेले नाही, केंद्राला राज्य सरकारकडून कधी प्रस्ताव जाणार आहे ,मदत कधी मिळणार? असा सवाल विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. वरळी डेअरीची मोक्याची जागा विशेष नियोजन क्षेत्र करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही जागा अदानींच्या घशात घालण्याचा हा डाव आहे. असे भूखंड विकून शेतकऱ्यांसाठी निधी उभा करता आला असता असे वडेट्टीवार म्हणाले.

एकीकडे राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगर मध्ये सरकार पुरस्कृत दंगल घडवण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. एकीकडे शेतकरी रडत आहे, लोकांची घर गेली, अन्नधान्य, कपडे ,पीक गेली. अहिल्यानगर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे पण कोणी रांगोळी काढावी त्यातून उद्रेक व्हावा , दोन समाजात वाद निर्माण केला जात आहे. जनतेच्या प्रश्नावरून लक्ष भरकटवण्यासाठी या गोष्टी घडवून आणल्या जात आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Digital Depression : डिजिटल क्रांतीमुळे डिप्रेशनचा धोका, हातातला मोबाईल जीवघेणा ठरू शकतो का? Digital Depression : डिजिटल क्रांतीमुळे डिप्रेशनचा धोका, हातातला मोबाईल जीवघेणा ठरू शकतो का?
आजचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. डिजिटल क्रांतीमुळे संपूर्ण जग एका मोबाईलमध्ये सामावले आहे. इंटरनेट, मोबाईलमुळे जगणं सोपं...
लग्नाच्या 5 वर्षांनंतर पाळणा हलला, महिलेने एक-दोन नव्हे… ‘इतक्या’ बाळांना दिला जन्म
वारंवार हात धुतल्याने आपण आजारी पडू शकतो? शरीराला हे त्रास होऊ शकतात
डेंग्यू झाला असल्यास भात खावा की नाही? आहार कसा असावा?
मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी; दिवाळी, छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
कापडाच्या कारखान्याला भीषण आग, 16 जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी नवविवाहित पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव, आरोपी पतीला अटक