म्यानमार भूकंपाने हादरले, 4.7 रिश्टर स्केलची नोंद
म्यानमारमध्ये पहाटे भूकंप झाला असून, (३० सप्टेंबर ) पहाटे झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी नोंदवण्यात आली. हे धक्के ईशान्येकडील राज्यांमध्ये, प्रामुख्याने मणिपूर, नागालँड आणि आसाममध्येही जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (एनसीएस) नुसार, हा भूकंप सकाळी ६:१० वाजता झाला. भूकंपाचे केंद्र मणिपूरच्या २७ किलोमीटर आग्नेयेस उखरुल येथे जमिनीच्या पातळीपासून १५ किलोमीटर खाली होते. हे स्थान नागालँडमधील वोखापासून १५५ किलोमीटर आग्नेयेस आणि दिमापूरपासून १५९ किलोमीटर आग्नेयेस आहे.
(३० सप्टेंबर) रात्री उशिरा महाराष्ट्रातील सातारा येथेही भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र कोल्हापूरच्या वायव्येस ९१ किलोमीटर अंतरावर, ५ किलोमीटर खोलीवर होते. त्यानंतर पहाटे ४:२८ वाजता तिबेटमध्ये ३.३ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
भूकंपाचे केंद्र मणिपूरच्या उखरुलपासून फक्त २७ किलोमीटर अंतरावर होते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, हा भूकंप मणिपूरमधील उखरुलपासून फक्त २७ किलोमीटर आग्नेयेस, म्यानमारमधील हिंदुस्थाच्या सीमेजवळ होता. एनसीएसच्या मते, भूकंपाचे अचूक निर्देशांक २४.७३ उत्तर अक्षांश आणि ९४.६३ पूर्व रेखांश होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List