उद्घाटन होऊनही चारमजली वाहनतळ धूळखात; महापालिका प्रशासनाची उदासीनता

उद्घाटन होऊनही चारमजली वाहनतळ धूळखात; महापालिका प्रशासनाची उदासीनता

भोसरीतील आळंदी रस्त्यावरील ‘कै. श्री. ज्ञानेश्वर सोपानराव गवळी वाहनतळा’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होऊन तीन महिने झाले. मात्र, हा चारमजली वाहनतळ सुरू करण्यास महापालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येऊ लागली आहे. त्यामुळे भोसरी आळंदी रस्त्यावर सातत्याने वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील हा पहिला चारमजली वाहनतळ आहे. महापालिकेच्या ‘इ’ प्रभाग स्थापत्य विभागाद्वारे या वास्तूचे काम डिसेंबर २०२४मध्ये पूर्ण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जूनमध्ये वाहनतळाचे उ‌द्घाटनही झाले. भोसरीतील आळंदी रस्त्यावर मुख्य बाजारपेठ वसली आहे. त्यातच या रस्त्यावर विविध विक्रेत्यांनीहातगाड्या लावल्या आहेत. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. पूर्वी महापालिका आणि भोसरी वाहतूक विभागाद्वारे या रस्त्यावर सम-विषम पार्किंगचे नियोजन केले होते. मात्र, काही काळानंतर अंमलबजावणी होऊ शकली नाही. या रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी कै. सखूबाई गवळी प्रवेशद्वारासमोरील जागेत महापालिकेने चारमजली ‘कै. श्री. ज्ञानेश्वर सोपानराव गवळी वाहनतळ’ उभारला आहे. या वाहनतळात दीडशे दुचाकींबरोबरच ७५ चारचाकी वाहने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहेत.

आळंदी रस्ता भागात महापालिका आणि भोसरी पोलीस वाहतूक विभागाने सम-विषम पार्किंगचे नियोजन केले होते. तसे फलकही लावण्यात आले; पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. ग्राहक आणि व्यावसायिक दुकानांसमोरच वाहने उभी करतात. याचा रहदारीस अडथळा होऊन परिसरात नेहमीच वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. येथील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी कै. सखूबाई गवळी प्रवेशद्वारासमोरील जागेत महापालिकेने चारमजली वाहनतळ उभारला. भाडेनिश्चितीचा प्रस्ताव महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाद्वारे नगररचना विभागाकडे पाठविण्यात आला. मात्र, नगररचना विभागाने भाडेनिश्चिती केल्यानंतर तत्काळ निविदा काढण्याचे भूमी व जिंदगी विभागाचे प्रयत्न असणार आहेत. दरम्यान, उद्घाटनानंतरही वाहनतळ सुरू न झाल्याने तेथे बकालपणा वाढत आहे. बाहनतळाच्या प्रवेशद्वारासमोरच कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. अंतर्गत भागातही अस्वच्छता वाढली आहे.

भोसरीतील चार मजली वाहनतळाच्या भाडेनिश्चितीसाठीचा नगररचना विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दर निश्चित होताच तत्काळ निविदा काढण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होताच वाहनतळ नागरिकांसाठी खुले करण्यात येईल.
सीताराम बहुरे, उपायुक्त, भूमी व जिंदगी विभाग

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;