‘शक्तिपीठ’ला पैसे घालविण्यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या! – सुप्रिया सुळे

‘शक्तिपीठ’ला पैसे घालविण्यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या! – सुप्रिया सुळे

‘राज्यातील अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, याबाबत गेल्या दोन महिन्यापासून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली आहे. सध्या अतिवृष्टीमुळे अन्नधान्य पिकवणारा शेतकरी आणखी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत एक वर्षापूर्वी दिलेले आश्वासन या सरकारला पूर्ण करता आले नाही. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाला 80 हजार कोटी घालविण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी,’ अशी सूचक मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मंगळवारी सकाळी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर खासदार सुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे दोन महत्त्वाची खाती आहेत. राज्यावर संकट आले तर केंद्राकडे मदतीसाठी पाहावे लागते, त्यामुळे संसदेत अधिवेशन सुरू असताना खासदारांच्या शिष्टमंडळासह त्यांना भेटून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. याबाबत महाराष्ट्र सरकारला सांगण्याची विनंतीही त्यांच्याकडे केली; पण याबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. गेल्या वर्षी याच सरकारने हमीभाव आणि शेतकरी कर्जमाफीसह अनेक आश्वासने दिली होती. आता एक वर्ष झाले तरी अजून ती पूर्ण झालेली नाहीत. ‘लाडकी बहीण’ योजनेतूनही अनेक बहिणींची नावे वगळली आहेत.

त्यामुळे हे सरकार पूर्णपणे असंवेदनशील असल्याची टीका करत, सध्या गेल्या दोन महिन्यापासून ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा म्हणून आपण महाराष्ट्र सरकारला सांगत असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीचा एक भाग भाजपसोबत असला, तरी त्यांचेही कौटुंबिक संबंध आहेत. आमचे मतभेद आहेत; पण मनभेद नसल्याचेही सुळे यांनी सांगितले.

…मग हैदराबाद गॅझेटचा उपयोग काय, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून हैदराबाद गॅझेटचा नेमका उपयोग काय? त्यामुळे नेमका फायदा काय? हे समजावून सांगावे, असे स्पष्ट मत व्यक्त करीत, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्र सरकारने कॉप्रिहेन्सिव्ह आरक्षणाचे बिल बनवावे. त्याला आपण ताकदीने पाठिंबा देऊ, असे स्पष्ट मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;