हनुमान मंदिरातील चौथऱ्यावर मांसाचे तुकडे! अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासारमध्ये तणाव, पोलिसांसह रॅपिड ऍक्शन फोर्सची तुकडी दाखल

हनुमान मंदिरातील चौथऱ्यावर मांसाचे तुकडे! अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासारमध्ये तणाव, पोलिसांसह रॅपिड ऍक्शन फोर्सची तुकडी दाखल

अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार येथील ग्रामदैवत पूर्वमुखी हनुमान मंदिरात मूर्तीच्या चौथऱ्यावर पाठीमागील बाजूस अज्ञात समाजकंटकाने मांसाचे तुकडे ठेवून विटंबना केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या घटनेने गावामध्ये तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी तातडीने समाजकंटकांचा शोध घ्यावा, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली. घटनेनंतर गावामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, रॅपिड ऍक्शन फोर्सची तुकडी दाखल झाली आहे.

सारोळा कासार गावच्या वेशीबाहेर पुर्वामुखी हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी सकाळी भाविक दर्शनाला गेल्यावर विटंबनेचा प्रकार निदर्शनास आला. घटना समजताच, गावात संतापाचे वातावरण पसरले. अनेक ग्रामस्थ, तरुण मोठय़ा संख्येने मंदिराजवळ जमा झाले. पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते फौजफाटय़ासह गावात दाखल झाले. काही वेळातच नगर ग्रामीणचे उपअधीक्षक शिरीष वमने हेही फौजफाटय़ासह गावात आले. रॅपिड ऍक्शन फोर्सची तुकडीही आली. पोलीस अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांनी आक्रमकपणे संतप्त भावना व्यक्त करत आरोपीला तातडीने पकडण्याची मागणी केली.

पोलिसांनी गावकऱ्यांना शांततेचे आवाहन करत, ‘तपास सुरू केला असून, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल’, असे आश्वासन दिले. त्यानंतर सारोळा कासार येथील युवक व ग्रामस्थांनी तातडीने मंदिराची स्वच्छता करून शुद्धीकरणाचा विधी केला. श्री हनुमान मूर्तीला पाणी व दुधाने अभिषेक करून आरती, हनुमान चालिसा आदींचे पठण करण्यात आले.

सारोळा कासार गावात सर्व जाती-धर्मांचे लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहत आहेत. गावच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने गावातील शांतता, ऐक्य व बंधुभाव याला बाधा आणण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;