खडकवासला धरणात पाणी सोडल्याने 20 जण अडकले
नवरात्रानिमित्त रविवारी खडकवासला धरण परिसरात कपडे धुण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडल्यामुळे वाढलेल्या प्रवाहाचा सामना करावा लागला. 15 ते 20 नागरिक धरणातील खडकांवर अडकून पडले होते. याबाबतची माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. रविवारी दुपारी अनेक नागरिक धरण परिसरात थांबले होते. अनेकजण किनाऱयावर कपडे धूत होते. मात्र, काहीजण आत खडकांवर उतरले होते. यादरम्यान 20 जण अडकून पडले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List