मी गोळीबाराचा आदेश दिला नव्हता, नेपाळमधील Gen-Z निदर्शनांमध्ये ७२ जणांच्या मृत्यूंबद्दल माजी पंतप्रधान ओली यांचा दावा

मी गोळीबाराचा आदेश दिला नव्हता, नेपाळमधील Gen-Z निदर्शनांमध्ये ७२ जणांच्या मृत्यूंबद्दल माजी पंतप्रधान ओली यांचा दावा

नेपाळमध्ये Gen-Z निदर्शनांच्या पहिल्या दिवशी झालेल्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाला होता. या निदर्शनांदरम्यान पोलिसांकडून गोळीबार झाल्याच्या आरोपांवर माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. “मी गोळीबाराचा आदेश दिला नव्हता, याची चौकशी करा,” असे ते म्हणाले आहेत. तसेच माझ्या कार्यकाळात पोलिसांकडे ऑटोमॅटिक शस्त्रास्त्रे नव्हती, असा दावाही त्यांनी केला आहे.

के.पी. शर्मा ओली म्हणाले आहेत की, “सरकारने आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले नव्हते. आंदोलकांवर ऑटोमॅटिक बंदुकांनी गोळीबार करण्यात आला, ज्या पोलिसांकडे नव्हत्या आणि याची चौकशी झाली पाहिजे.” ते म्हणाले, यात घुसखोरांनी कट रचून आंदोलनाला हिंसक वळण दिले. त्यामुळे आमचे तरुण मारले गेले.”

दरम्यान, ८ सप्टेंबर २०२५ रोजी नेपाळमध्ये Gen-Z तरुणांनी सुरू केलेल्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले. या दिवशी पोलीस आणि निदर्शकांमध्ये झालेल्या चकमकींमुळे १९ जणांचा गोळीबारात मृत्यू झाला. एकूणच या निदर्शनांमध्ये ७२ जणांचा बळी गेला, ज्यात भातभाटेनी सुपरमार्केटमध्ये आग लागल्याने मृत्यू पावलेल्या नागरिकांचाही समावेश आहे. निदर्शनकारांनी सिंह दरबार (प्रशासकीय मुख्यालय), संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, इतर न्यायालय परिसर, व्यावसायिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर हल्ले केले. याशिवाय, माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा, पुष्पकमल दाहाल (प्रचंड) आणि झलनाथ खनाल यांच्या घरीही आग लावण्यात आली. विशेषतः ओली यांचे बालकोट, भक्तपूर येथील घरही जाळण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार, दोन जवान शहीद मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार, दोन जवान शहीद
मणिपूरमधील बिष्णूपूर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत....
देवेंद्र फडणवीस हे ‘चोमु’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Photo – शिवसेना भवनात मुंबईतील महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
मी गोळीबाराचा आदेश दिला नव्हता, नेपाळमधील Gen-Z निदर्शनांमध्ये ७२ जणांच्या मृत्यूंबद्दल माजी पंतप्रधान ओली यांचा दावा
Ahilyanagar News – बेदरकारपणे बुलेट चालवून स्टंट आणि रिल्स बनवणारे दोन तरुण गंभीर जखमी, तीन आठवड्यानंतर गुन्हा दाखल
‘या अली’ फेम प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांचे निधन, सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झाला अपघात
निवडणूक आयोगाची कारवाई; ४७४ गैर-मान्यता प्राप्त पक्षांना केले डीलिस्ट, महाराष्ट्रातीलही ४४ पक्षांचा समावेश