मोदींच्या एसपीजी कमांडो टीमच्या मोटारींची बिले दोन वर्षे थकवली, 12 लाखांसाठी दोन वर्षांची प्रतीक्षा

मोदींच्या एसपीजी कमांडो टीमच्या मोटारींची बिले दोन वर्षे थकवली, 12 लाखांसाठी दोन वर्षांची प्रतीक्षा

राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे आणखी एक उदाहरण पुढे आले.  दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगर दौऱ्यात सुरक्षा ताफ्यातील एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) कमांडो टीमसाठी 29 मोटारी भाडय़ाने घेतल्या होत्या, पण या मोटारींचे 12 लाख रुपयांचे भाडे गृह विभागाच्या वतीने आज तब्बल दोन वर्षांनी अदा करण्यात आले.

अहिल्यानगर जिह्यातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्याच्या निमित्ताने 26 ऑक्टोबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होता. मोदींच्या संरक्षण ताफ्यात नवी दिल्लीतून एसपीजीची टीम अहिल्यानगरला आली होती. एसपीजीच्या टीमसाठी अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांनी नाशिकमधील गणेश टुर्स अँड ट्रॅव्हल्स या खासगी टुर कंपनीकडून 29 इनोव्हा मोटारी भाडय़ाने घेतल्या होत्या.

पंतप्रधानांच्या कोणत्याही दौऱ्याच्या काही दिवस आधी एसपीजीची टीम दाखल होते. या दौऱ्यात आलेल्या एसपीजी टीमसाठी 22 ते 28 ऑक्टोबर 2023 या काळासाठी 29 इनोव्हा मोटारी भाडय़ाने घेतल्या होत्या, पण या मोटारींचे भाडे दोन वर्षांपासून थकले होते. ही बिले अदा करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर गृह विभागाने आज या प्रस्तावास कार्योत्तर मंजुरी दिली आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टुर कंपनीला पैसे मिळाले आहेत.

 दोन कंत्राटदारांच्या आत्महत्या

राज्याची आर्थिक स्थिती सध्या वाईट असल्यामुळे लाखो रुपयांची कंत्राटदारांची देणी थकली आहेत. शासकीय कंत्राटदारांची कोटयवधी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. त्यामुळे आतापर्यंत दोन कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याच्या घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. शासकीय बिले थकल्यामुळे सार्वजनिक विभागाच्या पी. व्ही. वर्मा या कंत्राटदाराने आत्महत्या केली. या कंत्राटदाराची 40 लाख रुपयांची बिले सरकारने थकवली होती. काही महिन्यांपूर्वी सांगलीतल्या वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केली होती. राज्यात शेतकऱ्यांच्या नंतर आता कंत्राटदारांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;