गर्भधारणेमुळेच नाही तर ‘या’ गंभीर कारणामुळे देखील मासिक पाळी येत नाही, दुर्लक्ष करु नका
आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार डोकं वर काढत आहेत. याचा फटका महिलांच्या आरोग्यास अधिक बसत आहे. महिलांच्या मासिक पाळीवर आजच्या जीवनशैलीचा परिणाम होत आहे. मासिक पाळी चुकल्यानंतर काळजी वाटते कारण हे गर्भधारणेचं प्रमुख लक्षण आहे. पण मासिक पाळी न येण्यामागे गर्भधारणे शिवाय इतर देखील कारणं आहेत. तर की कारणं कोणती आहेत जाणून घ्या…
मासिक पाळीच्या काळात महिलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. जर तुमची मासिक पाळी महिनाभरापासून चुकली असेल. तर मनात येणारा पहिला विचार म्हणजे तुम्ही गर्भवती नाही आहात, तर काही महिलांना वाटतं की मासिक पाळी न येणे म्हणजे तुम्ही गर्भवती आहात. पण हेच कारण असू शकतं असं नाही. मासिक पाळी न येण्यामागे अनेक कारणं आहेत.
मासिक पाळी न येणं हे नेहमीच महिलांसाठी तणाव आणि गोंधळाचं कारण असू शकतं. सर्वात आधी मनात येणारी गोष्ट म्हणजे हे गर्भधारणेचं लक्षण आहे का. प्रत्यक्षात, यामागे अनेक कारणं असू शकतात. जसं की ताण, हार्मोनल असंतुलन, वजन वाढणं आणि कमी होणं, थायरॉईड किंवा पीसीओएस सारख्या वैद्यकीय परिस्थिती, यासाठी केवळ गर्भधारणेचं लक्षण म्हणून दुर्लक्ष करणं गंभीर आहे. तर इतर कारणांकडे देखील लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
ताण, चिंता आणि झोपेचा अभाव यामुळेही तुमच्या मासिक पाळीच्या चक्रात व्यत्यय येऊ शकतो. ताणतणावाच्या काळात, शरीर जास्त कॉर्टिसोल हार्मोन तयार करतं, ज्यामुळे ओव्हुलेशन आणि हार्मोनल संतुलनावर परिणाम होतो. म्हणूनच कधीकधी ताणतणावामुळे मासिक पाळी चुकते.
काही महिलांमध्ये पीसीओएस (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) आणि थायरॉईड विकार हे देखील मासिक पाळी न येण्याचं प्रमुख कारण असू शकतात. पीसीओएसमध्ये, अंडाशयात लहान सिस्ट तयार होतात. याचा परिणाम ओव्हुलेशनवर होतो. थायरॉईड तुमच्या मासिक पाळीच्या चक्रात देखील व्यत्यय आणू शकते.
मासिक पाळी नियंत्रित करण्यात शरीराचं वजन देखील महत्त्वाची भूमिका बजावते. जास्त वजनामुळे शरीरात इस्ट्रोजेन हार्मोन वाढतं. यामुळे मासिक पाळी चुकू शकते. कमी वजन किंवा अचानक वजन कमी झाल्यामुळे शरीरात ओव्हुलेशन थांबू शकतं.
काही महिला गर्भनिरोधक गोळ्या किंवा हार्मोनल औषधे घेतात. या औषधांमुळे मासिक पाळी येण्यासही अडचण येऊ शकते. औषधे बंद केल्यानंतरही, शरीराला सामान्य चक्रात परत येण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. जर तुमची मासिक पाळी वारंवार येत नसेल तर. यासोबतच, पोटदुखी, केस गळणं, वजन वाढणं, थकवा किंवा अनियमित रक्तस्त्राव यासारख्या समस्या देखील उद्भवत असतील तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
टीप: येथे दिलेली माहिती फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. कोणताही उपचार घेण्यापूर्वी किंवा अंमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List