मराठा, कुणबी एक नाहीत सरकारी जीआर रद्द करा! सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

मराठा, कुणबी एक नाहीत  सरकारी जीआर रद्द करा! सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

मराठय़ांना कुणबी दर्जा देण्याच्या हैदराबाद गॅझेटीयरच्या अंमलबजावणीशी संबंधित 2 सप्टेंबरच्या सरकारी जीआरला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. मराठा, कुणबी एक नाहीत. पुरेशा माहितीअभावी राजकीयदृष्टय़ा प्रबळ आणि प्रगत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून दाखले देण्याचा सरकारचा निर्णय मनमानीकारक असून, संविधानाचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे सरकारी जीआर रद्द करण्यात यावा, अशी मुख्य मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा धसका घेत राज्य सरकारने मराठय़ांना हैदराबाद
गॅझेटमधील नोंदीच्या आधारे ओबीसी प्रवर्गातून दाखले देण्याचा निर्णय घेतला. याबाबत 2 सप्टेंबर रोजी शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला. मात्र हा शासन निर्णय कायद्याला धरून नाही, असा दावा करत वकील विनित धोत्रे यांनी अॅड. राजेश  खोब्रागडे यांच्यामार्फत याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. जीआरमध्ये पुरेशा माहितीशिवाय सामाजिकदृष्टय़ा प्रगत मराठा समाजाला मनमानीपणे ओबीसी दर्जा देण्यात आला असून यामुळे संविधानाच्या कलम 14 चे उल्लंघन झाल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. हा जीआर ओबीसी आरक्षणातील त्यांचा वाटा कमी करून भेदभाव करत असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेनेही अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की, ‘राज्य मागासवर्ग आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या असंख्य अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या  निकालांनुसार मराठा आणि कुणबी हे एक नाहीत, असे सांगूनही सरकार पुन्हा मराठा आणि कुणबी एकच आहेत असा प्रचार करत आहे. या दोन्ही याचिकांवर हायकोर्टात लवकरच सुनावणीची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नेपाळ हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशलगतच्या सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था, हिंदुस्थानींसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी नेपाळ हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशलगतच्या सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था, हिंदुस्थानींसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी
नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर हिंदुस्थानलगतच्या सीमा भागांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक (डीजीपी) राजीव कृष्णा...
डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली किर्क यांची गोळ्या घालून हत्या, अमेरिकेत राष्ट्रीय शोक जाहीर
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 11 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
भयमुक्त नाशिकसाठी शिवसेना, मनसेचा उद्या संयुक्त जनआक्रोश मोर्चा
मराठा, कुणबी एक नाहीत सरकारी जीआर रद्द करा! सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान
हार्बरचे बोरिवलीपर्यंत विस्तारीकरण लटकले, काम पूर्ण होण्यास आणखी अडीच वर्षे लागणार
निवडणूक अधिकाऱ्यांचे भाजप आमदारांशी पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘गुफ्तगू’, पिंपरी- चिंचवड प्रभाग रचनेवर संशयाचे धुके