ट्रेंड -छोटय़ांचा मोठा आनंद
छोटय़ा-छोटय़ा गोष्टींचा आनंद घ्यायला शिकलं तर आयुष्य आनंदी होऊ इन जातं. पण होतं काय की माणूस मोठय़ा सुखाच्या शोधात धडपडत राहतो आणि छोटे-छोटे आनंद घ्यायचंच विसरून जातो. काखेत कळसा आणि गावाला वळसा असा हा प्रकार असतो. असे वळसे घालणाऱयांच्या डोळ्यात अंजन घालेल असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हिंदुस्थानच्या कुठल्या तरी खेडय़ातील हा व्हिडिओ आहे. यात एक झोपडीबाहेर आई आणि लेक नव्या सायकलीची पूजा करताना दिसत आहे. जग ईव्ही आणि ड्रोन डिलिव्हरीच्या जगात पोहोचलं असताना गरीबाला कष्टाची सायकल किती आनंद देऊ शकते हे सांगणारा हा व्हिडिओ आहे. छोटय़ांचं मोठेपण असं की त्यांनी हा आनंद वाटून घेण्यासाठी या सायकलपूजेचा व्हिडिओ शेअर केला आहे. https://tinyurl.com/yc3wyb9u या लिंकवर हा व्हिडिओ पाहता येईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List