पोस्कोच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत डॉक्टर दाम्पत्याकडे खंडणीची मागणी, चौघांविरोधात गुन्हा दाखल
पोक्सोअंतर्गत दाखल गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केली. तसेच डॉक्टर दाम्पत्याकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी विजय पवारसह तीन महिलांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गाडे, विजय पवार, शिल्पा मस्के आणि साक्षी सुरेश म्हस्के अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी 24 जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शहरातील यशवंतनगर पावडेवाडी नाका येथील केसराळे हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष श्यामसुंदर केसराळे यांच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या पत्नीस शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच पोस्कोअंतर्गत गुन्ह्यात अडकवण्याची मागणी करत 15 लाख रुपयांची खंडणी मागितली.
प्रियंका गाडे आणि विजय पवार यांनी गुन्हा दाखल करण्याची तसेच हॉस्पिटलची तोडफोड करण्याची धमकी देऊन फिर्यादीकडून 1 लाख 50 हजार रुपये घेतले. यानंतर सतत 2 लाख 50 हजार रुपयाची मागणी करून पैसे न दिल्यास त्यांच्या वकिलामार्फत पोस्कोअंतर्गत गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी डॉक्टर दाम्पत्याला दिली. अखेर डॉक्टर संतोष केसराळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. शिवाजीनगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List