हिंदुस्थानवर आजपासून 50 टक्के टॅरिफचा बॉम्ब; मोदींची पळापळ… आधी जपान मग चीनकडे धाव

हिंदुस्थानवर आजपासून 50 टक्के टॅरिफचा बॉम्ब; मोदींची पळापळ… आधी जपान मग चीनकडे धाव

अमेरिकेने हिंदुस्थानी आयातीवर लादलेला 50 टक्के टॅरिफ 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने तशी अधिसूचनाच आज काढली. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारची पळापळ सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी जपान दौऱ्यावर जात असून त्यानंतर ते चीनला जाणार आहेत. या दौऱयात ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ टेररिझम’वर चर्चा होण्याची शक्यता आहे.

अमेरिकन गृह मंत्रालयाने आज टॅरिफच्या अंमलबजावणीची अधिसूचना काढली. त्यानुसार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9.31 वाजता किंवा त्यानंतर हिंदुस्थानी गोदामाबाहेर पडणाऱया वस्तूवर नव्या दराने टॅरिफ आकारला जाईल. या वेळेआधी गोदामाबाहेर पडलेल्या किंवा प्रवासात असलेल्या वस्तूंना यातून वगळले जाईल. मात्र त्याची रीतसर सूचना आयातदारांनी देणे गरजेचे आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

शेअर बाजारात हाहाकार

टॅरिफचे परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असून, मंगळवारी मुंबई शेअर बाजारात हाहाकार उडाला. सेन्सेक्स 849 अंकांची घसरून 80,786 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 255 अंकांनी घसरून 24,712 अंकांवर बंद झाला.

कापूस उत्पादकांना फटका – अनिल देशमुख

या वर्षी राज्यात सुमारे 40 लाख 73 हजार हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होऊनही कापसाची विदेशातून आयात करण्यात येत आहे. यासाठी कापसावरील आयात शुल्क सुध्दा रद्द करण्यात आले आहे. दुसरीकडे हिंदुस्थानमधून अमेरिकेत मोठय़ा प्रमाणात कापूस निर्यात केला जात असताना 50 टक्के टॅरिफचा फटका कापूस निर्यातीवर होणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या दबावाला बळी पडणार नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या टॅरिफ नीतीवर भाष्य केले आहे. आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. शेतकरी, छोटे उद्योजक व उत्पादकांच्या हिताशी तडजोड करणार नाही, असे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, टॅरिफच्या विषयावर चर्चेसाठी ट्रम्प यांनी मोदींना चार वेळा कॉल केला होता, मात्र मोदींनी त्यांचा फोनच उचलला नाही, असा दावा एका जर्मन वृत्तपत्राने केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नीचे निधन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नीचे निधन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील (51) यांचे बुधवारी मुंबईतील...
हा देश फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार – सुप्रिया सुळे
Ratnagiri News – महावितरणचा अजब कारभार, मीटर बसवलेला नसतानाही 740 रुपयांचे बील
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत नक्की काय घडलं? संजय राऊत यांनी दिली संपूर्ण माहिती
Maratha Reservation – हैदराबाद गॅझेटियरचा GR; सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल, आंदोलनकर्त्यांचा बाजू ऐकली जाणार
ठाणे-वाशी लोकलमध्ये सीटवरून दोन प्रवाशांमध्ये हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Breaking News – शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार; दसरा मेळाव्यासाठी मिळाली परवानगी