मावशी रागवली म्हणून तिच्या मुलाचा गळा चिरला, कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या मुलाचा मारेकरी गजाआड

मावशी रागवली म्हणून तिच्या मुलाचा गळा चिरला, कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या मुलाचा मारेकरी गजाआड

कुशीनगर एक्सप्रेसमध्ये हत्या करून फेकलेल्या अल्पवयीन मुलाच्या मारेकऱ्याला लोकमान्य टिळक टर्मिनस पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विपुल शहा असे आरोपीचे नाव असून तो मृत मुलाचा मावस भाऊ आहे. विपुलला काही दिवसांपूर्वी त्याची मावशी ओरडली होती. त्या रागातूनच त्याने मावशीच्या मुलाचीच गळा चिरून हत्या केली होती.

विपुल व त्याच्या मावशीचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यावेळी मावशी त्याला कामचुकार म्हणाली होती. तसंच  माझा मुलगा जर तुझ्यासारखा असता तर त्याला मारला असता असे  देखील सुनावले होते. त्यामुळे विपुल मावशीवर भडकला होता व त्याने मावशीला धडा शिकवायचे ठरवले. विपुलने मावशीच्या तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याची गळा चिरून हत्या केली व त्याचा मृतदेह कुशीनगर एक्स्प्रेसच्या एसी बोगीतील शौचालयातल्या कचरा पेटीत टाकला होता.

शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस पोलिसांना कुशीनगर एक्स्प्रेसच्या एसी बोगीतील शौचालयातल्या कचरा पेटीत तीन वर्षांच्या मुलाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर लोकमान्य टिळक टर्मिनस पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जब्बार तांबोळी व त्यांच्या पथकाने कसून शोध मोहिम राबवून  आरोपी विपुल शहा याला वांद्रे कुर्ला मेट्रो यार्डातून अटक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;