बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय बालकाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच चिमुकल्यावर झडप
पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वरवाडी रस्त्यावरील बारामती ॲग्रो परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. अमन पन्नूलाल खुंटे असे मयत बालकाचे नाव आहे. रात्री लघुशंकेसाठी बाहेर आला असतानाच वाघाने त्याच्यावर झडप घालत जंगलात ओढत नेले.
स्थानिकांनी तात्काळ वन विभागाला घटनेची माहिती दिली. वन विभागाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. यात स्थानिक नागरिकही सहभागी झाले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. मंगळवारी सकाळी आठ वाजता सिद्धेश्वरवाडी परिसरातील जंगलात, घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर झाडाझुडपात अमनचा मृतदेह आढळला. बिबट्याचा शोध घेण्यासाठी परिसरात पिंजरे लावण्यात आले असून, गस्त वाढवली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List