Priya Marathe Death: ‘या’ गंभीर आजारामुळे प्रियाचं निधन, शरीरात पसरला आजार, वेळेत ओळखण्यासाठी या चाचण्या महत्त्वाच्या
Priya Marathe Death: ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनानंतर कुटुंबियांसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. प्रिया हिने रविवारी सकाळी 4 वाजता अखेरचा श्वास घेतला. कर्करोगामुळे अभिनेत्रीचं निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून प्रिया हिच्यावर उपचार सुरु होते. पण या लढाईत प्रिया हिला अपयश आलं आणि अभिनेत्रीने मुंबई येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या शरीरात कर्करोग पसरू लागला आणि त्याची प्रकृती अधिकच बिकट होत गेली.
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, जर सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाचं निदान झालं तर रुग्णाचा जीव वाचवणं सोपं होतं. म्हणून, कर्करोग टाळण्यासाठी, तुम्ही काही चाचण्या करत राहिल्या पाहिजेत. यामुळे कर्करोगामुळे मृत्यूचा धोका कमी होतो. कर्करोगाचं निदान करण्यासाठी, डॉक्टर बायोप्सी चाचणी करण्यास सांगतात. शरीरात कर्करोगाची तपासणी करण्यासाठी आणि कर्करोग किती प्रमाणात पसरला आहे हे शोधण्यासाठी बायोप्सी चाचणी केली जाते.
महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका खूप वाढत आहे. 25 वर्षांनंतर, प्रत्येक महिलेने दरवर्षी स्तनाच्या कर्करोगाची चाचणी करून घ्यावी. स्तनाचा कर्करोग शोधण्यासाठी CA15.3 चाचणी केली जाते. याशिवाय शारीरिक तपासणी देखील केली जाते.
पोटाच्या कर्करोगाचं निदान करण्यासाठी CA72.4 मार्कर वापरला जातो. तुम्ही वर्षातून एकदा ही चाचणी करावी. स्वादुपिंडाच्या कर्करोगासाठी, तुम्ही CA 19.9 चाचणी करावी. पुरुषांनीही CAA आणि PSA चाचण्या करून घ्याव्यात. यामुळे प्रोस्टेट कर्करोगाचं निदान होतं.
महिलांनी 40 वर्षांनंतर CA 125 मार्करची तपासणी करावी. ही गर्भाशयाच्या कर्करोगाची चाचणी आहे. महिलांनी पोटाच्या कर्करोगासाठी CA72.4 आणि CAA जनरल अँटीजेन चाचणी देखील करावी. तुम्ही वर्षातून एकदा या चाचण्या नक्कीच करून घ्याव्यात.
या चाचण्या करून कर्करोगाचे निदान बऱ्याच प्रमाणात करता येते. कर्करोगाचे निदान जितक्या लवकर होईल तितके उपचार चांगले होतील. यामुळेच कर्करोगाच्या वाढत्या घटनांसह, कर्करोगाच्या निदानाबद्दल जागरूकता पसरवली जात आहे. ज्यामुळे अनेकांचं प्राण वाचू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करा…
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List