Latur news – निम्न तेरणा प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात थोड्या अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. धरण पाणलोट क्षेत्रामध्येही कोसळधारा सुरू असल्याने धरणामध्ये नव्या पाण्याची आवक सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून तेरणा नदीवरील निम्न तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले.
तेरणा नदीवरील माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वेगाने सुरू असून पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी शनिवारी सकाळी सातच्या सुमारास निम्न तेरणा प्रकल्पाचे 1 , 14 , 7, 8, 6, 9, 4, 11, 3, 12 असे दहा दरवाजे उघण्यात आले. हे दरवाजे 10 सेंटिमिटर उघडण्यात आली असून तेरणा नदी पात्रामध्ये 3806.56 क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच नदी काठावरील आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
निम्न तेरणा प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले; नदीपात्रात 3806 क्यूसेक्स वेगाने विसर्ग, नदीकाठच्या गावांना खबरदारीचा इशारा pic.twitter.com/oRF1O6P3Xg
— Saamana Online (@SaamanaOnline) August 16, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List