Rain Alert – कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज

Rain Alert – कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज

आठवडाभरापूर्वी धुमशान घालणारा पाऊस पुन्हा जोरदार बॅटिंग करण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी सकाळी मुंबईच्या अनेक भागांत जोरदार पाऊस पडला. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नवीन अलर्ट जारी केला आहे. चार दिवस म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मात्र कोकण आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकणसह राज्याच्या अनेक भागांत सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. याचदरम्यान वरुणराजा जोरदार हजेरी लावणार आहे. मुंबईत काही ठिकाणी जोरदार वारे वाहण्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुलनेत कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असेल. काही जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसण्याची चिन्हे आहेत. त्याच अनुषंगाने हवामान खात्याने सावधानतेचे अलर्ट जारी केले आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरुवारी दक्षिण कोकण आणि गोवा परिसरात बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

29 ऑगस्ट रोजी दक्षिण कोकण आणि गोवा परिसरात बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट रोजी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असे भाकीत हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल
नारळाच्या पाणी आरोग्यासाठी किती फायदेशी असते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. नारळाचं पाणी म्हणजे आजारी माणसांपासून ते डाएट करणाऱ्या व्यक्तींपर्यंत...
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलीय, सुप्रिया सुळे यांची टीका
काठमांडूला जाणाऱ्या स्पाईटजेटच्या विमानात आगीची शंका, दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग
Sindhudurg News – जमिनीच्या वादातून आईच्या डोक्यावर दगड मारला, वडील आणि भावावर कोयता उगारला
रत्नागिरी तिहेरी हत्याकांड प्रकरण, दुर्वास पाटीलसह दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
आम्ही घाबरणाऱ्यातले नाही, रस्त्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ; संजय सिंह यांनी भाजपला ठणकावले
छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये चकमक, सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा