तुमचा फ्रीज ठरू शकतो आजाराचं कारण, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न सेवन करण्याचे दुष्परिणाम माहीत आहेत का ?
आजकालच्या धावत्या जीवनशैलीमुळे, जॉबमुळे अनेकांना दररोज ताजे अन्न शिजविणे खूप कठीण झाले आहे. यामुळे, काही लोक अनेकदा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अन्न शिजवून तयार करतात आणि नंतर वापरण्यासाठी ते रेफ्रिजरेटरमध्ये साठवतात. पण बरेच आरोग्य तज्ञ असे फ्रिजमध्ये साठवलेले अन्न न खाण्याचा सल्ला देतात. फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवलेल्या अन्न खाल्ल्याने काय दुष्परिणाम होतात आणि ते किती वेळ साठवून ठेवणे योग्य आहे, हे जाणून घेऊया.
फ्रीजमध्ये अन्न साठवणं योग्य आहे की नाही ?
फ्रीजमध्ये अन्न ठेवल्यास त्यातील पोषक घटक नष्ट होतात, असा लोकांमध्ये गैरसमज आहे. उलट, काही वेळा स्वयंपाक करतानाच अन्नातील अनेक पोषक तत्वे नष्ट होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरं तर जीवनसत्त्वं ही उष्णतेमुळे नष्ट होतात, थंडाव्यामुळे नव्हे. हवाबंद डब्यात शिजवलेले बहुतेक अन्न किमान दोन ते तीन दिवस टिकू शकते, अगदी एक आठवड्यापर्यंत चांगले राहू शकते, असे तज्ज्ञांनी नमूद केले. फ्रीझरमध्ये ठेवलेले अनेक खाद्यपदार्थ सहा महिन्यांपर्यंत टिकू शकतात. सर्व जैविक क्रिया या तापमानासह मंदावतात त्यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता कमी असते. पण शक्यतो ताज अन्न खाणे योग्य
काही पदार्थ लवकर खराब होतात
लवकर खराब होणारे पदार्थांची यादी नक्की वेगळी आहे. साध्या शिजवलेल्या भातामध्ये कधीकधी असे जीवाणू वाढू शकतात जे कमी तापमानातही चांगले टिकतात. म्हणूनच फ्रिजमध्ये ठेवलेला भात एक दिवस किंवा दोन दिवसात खाऊन संपवणे कधीही चांगले आहे. याशिवाय भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मसाले, खारट आणि आंबट पदार्थ फ्रिज-फ्रेंडली असतात जसं की घरी लावलेलं दही, लोणचे इत्यादी.
हे पदार्थ खाऊन लवकर संपवा
अन्न फ्रीजमध्ये ठेवल्याने वेळ वाचतो पण आरोग्यासाठी ते किती सुरक्षित आहे असा प्रश्न पडतो. तर मांस, अंडी , मासे, दुग्धजन्य पदार्थ यांसारखे नाशवंत पदार्थ फ्रीजमध्ये ठेवावेत आणि ते काही दिवसांत अथवा आठवडाभरात वापरावेत. तर ब्रेड, फळे आणि भाज्या यांसारखे लवकर खराब न होणारे पदार्थ जास्त काळ फ्रीजमध्ये साठवता येतात.
कशी रोखावी बॅक्टेरियाची वाढ?
अन्नामध्ये बॅक्टेरिया तयार होऊ नयेत आणि ते वाढून नयेत म्हणून सर्वप्रथम नाशवंत गोष्टी खाव्यात. यानंतर, उरलेले अन्न हवाबंद डब्यात साठवावे किंवा झाकून ठेवावे. तुमचे उरलेले अन्न रेफ्रिजरेटरच्या वरच्या रॅकमध्ये ठेवा जेणेकरून त्याला अधिक हवा आणि थंडपणा मिळेल. शिळे उरलेले अन्न फ्रीजच्या पुढच्या बाजूला आणि ताजे अन्न मागे ठेवावे. आणि ते लवकरात लवकर खाऊन संपवा. तसेत जर अन्नाला आंबट किंवा कोणत्याही प्रकारचा वास येत असेल तर ते अन्न अजिबाक खाऊ नका. ते विषाप्रमाणेच शरीरावर प्रक्रिया करेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List