उपाशी पोटी दूध प्यायल्याने काय होतं? जाणून घ्या, अन्यथा शरीरावर…
लहान मूलं असू द्या किंवा मग मोठी माणसं दूध पिण्याचा सल्ला जवळपास सर्वांनाच दिला जातो. कारण त्यात असलेले कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे इत्यादी असंख्य पोषक घटक त्याला संपूर्ण आहार बनवतात. म्हणूनच प्रत्येकाच्या घरात आहारात दूध पिणे हा एक अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणून अंमलात आणला जातो.
दूध हे शरीरासाठी जसं पौष्टीक असतं. तसंच ते नुकसानकारकही असतं.
काही महिला तर सकाळी मुलांना दूध आणि बिस्किटे पाजून शाळेत पाठवतात आणि काहीजण रात्री झोपण्यापूर्वी मुलांना एक ग्लास दूध पायला देतात. बहुतेक घरांमध्ये सकाळी नाश्त्यात लहान मुलांसाठी तर नेहमीच दूध असतंच असतं. तर काहीवेळेला काहीजण ऑफिसला जाण्याआधी चहा ऐवजी एक कप दूध घेऊन जातात. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की. दूध हे शरीरासाठी जसं पौष्टीक असतं. तसंच ते नुकसानकारकही असतं.
सकाळी रिकाम्या पोटी दूध पिणे फायदेशीर ठरण्यापेक्षा जास्त हानिकारक
जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना किंवा स्वत: देखील पौष्टीक म्हणून सकाळी उपाशी पोटी दूध पित असाल तर नक्कीच त्यामुळे पोटाचे आजारही होऊ शकतात. त्रास होऊ शकतो. आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्या पोटी दूध पिणे फायदेशीर ठरण्यापेक्षा जास्त हानिकारक ठरू शकतात. दुधात लैक्टोज नावाची साखर असते. त्यामुळे इन्सुलिन वाढू शकते. त्यामुळे उपाशी पोटी दूध पिले तर फायद्याऐवजी शरीरावर त्याचे उलट परिणाम होऊ शकतात.
रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय परिणाम होऊ शकतात
> काही लोक ते पचवू शकत नाहीत आणि त्यांना लैक्टोज इंटोलेरेंट म्हणतात. जर असे लोक सकाळी रिकाम्या पोटी दूध प्यायले तर त्यांना त्वचेवर खाज सुटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अतिसार इत्यादी ऍलर्जी होऊ शकते.
> रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे पोटफुगी, गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या उद्भवतात.
> दूध आम्लयुक्त असते, म्हणून सकाळी रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काही लोकांमध्ये आम्लपित्त होऊ शकते. फॅटयुक्त दूधामुळे छातीत जळजळ आणि आम्लपित्त होऊ शकते.
> सकाळी रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने इतर पोषक तत्वांचे शोषण होण्यास अडथळा येऊ शकतो. दुधात असलेले कॅल्शियम लोहासारख्या पोषक तत्वांचे शोषण रोखते. यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.
> सकाळी रिकाम्या पोटी फॅट आणि कॉम्प्लेक्स कार्ब्सने समृद्ध दूध प्यायल्याने पचन प्रक्रिया मंदावते.
> फुल फॅट दुधात भरपूर कॅलरीज असतात आणि सकाळी रिकाम्या पोटी ते प्यायल्याने वजन लवकर वाढते.
> त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी दूध घेऊ नये. काहीतरी नाश्ता करून त्याच्या पाच ते दहा मिनीटांनी हे दूध प्यावे. किंवा रात्री झोपण्यापूर्वी दूध घणे कधीही उत्तम. पण तुम्हाला ही दूध न पचण्याचा त्रास असेल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List