लडाखमधील सियाचीन ग्लेशियरमध्ये हिमस्खलन, तीन जवानांना वीरमरण
लडाखमधील सियाचीन ग्लेशियरमध्ये मंगळवारी लष्कराच्या चौकीवर हिमस्खलन झाले. यात लष्कराच्या तीन जवानांना वीरमरण आले. घटनेची माहिती मिळताच लष्कर आणि हवाई दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. लेह आणि उधमपूर येथून देखील मदत मागवली. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
तीनही सैनिक महार रेजिमेंटचे होते. हे तिघेही गुजरात, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील होते. हिमस्खलनात पाच सैनिक अडकले आहेत. एका कॅप्टनला वाचवण्यात यश आले आहे. विशेष हिमस्खलन बचाव पथके (एआरटी) घटनास्थळी दाखल झाली असून बर्फात अडकलेल्या सैनिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जखमींना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी चित्ता आणि एमआय-17 सारख्या लष्कराच्या हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List