फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ही 5 फळे; अन्यथा आरोग्यावर होईल वाईट परिणाम
फळे खाणे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर मानले जातात. पण आपण फळांच्याबाबतही अशा काही चुका करतो की त्यामुळे आरोग्याला फायदा कमी आणि नुकसानच जास्त होऊ शकतं. यातील एक चूक म्हणजे फ्रिजमध्ये फळे ठेवणे. हो अशी काही फळे असतात जी फ्रीजमध्ये ठेवल्याने आणि नंतर ती खाल्ल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते.
बऱ्याचदा आपण फळे लवकर खराब होऊ नये म्हणून ती फ्रीजमध्ये ठेवतो पण हा नियम सगळ्याच फळांच्याबाबात लागू होत नाही. चला तर मग जाणून घेऊयात फ्रिजमध्ये ठेवू नये अशी फळे कोणती आहेत ती?
बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की फळे फ्रिजमध्ये ठेवल्याने ती जास्त काळ टीकतात. परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की प्रत्येक फळ फ्रिजमध्ये ठेवणे योग्य नाही. काही फळे अशी आहेत, ज्यांचे पौष्टिक मूल्य कमी होते आणि फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांची चव देखील खराब होते. इतकेच नाही तर अनेक वेळा ही फळे फ्रिजमध्ये ठेवल्याने लवकर खराब होऊ शकतात आणि आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते.
केळी
केळी कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. केळी हे एक असे फळ आहे जे कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याचा रंग काळा होऊ लागतो.त्यात असलेला इथिलीन वायू त्याच्याजवळ ठेवलेल्या इतर फळांना देखील खराब करण्याचं काम करतो. म्हणून, केळी नेहमी नॉर्मल घरातील तपमानातच ठेवणे किंवा साठवणे योग्य मानले जाते.
एवोकॅडो
एवोकॅडो खोलीच्या तपमानावर साठवा. हे फळे फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे.कच्चे अॅव्होकॅडो फ्रिजमध्ये ठेवल्यास ते टिकून राहण्यापेक्षा उलट लवकर खराब होते. फ्रीजमध्ये ठेवल्याने एवोकॅडो पिकणे थांबते. तर बाहेर ठेवल्याने ते नैसर्गिकरित्या पिकते आणि खाण्यायोग्य बनते. तसेच त्यातील पोषक तत्वही टिकून राहातात.
खरबूज
खरबूज कापेपर्यंत बाहेर ठेवा. खरबूज कापेपर्यंत फ्रिजच्या बाहेरच ठेवावे. बाहेर ठेवल्याने त्याची गोडवा आणि चव टिकून राहते. कापल्यानंतरच ते फ्रिजमध्ये ठेवणे चांगले जेणेकरून ते लवकर खराब होणार नाही. आणि फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही ते लवकरात लवकर संपवणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते.
सफरचंद
सफरचंद जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नका. फ्रिजमध्ये सफरचंद ठेवणे हानिकारक ठरू शकते. सफरचंदांमध्ये असलेले नैसर्गिक एंजाइम ते पिकवतात. सफरचंद जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने ते जास्त पिकतात. यामुळे त्याची चव आणि पोत दोन्ही खराब होऊ शकते.
आंबा
आंबा देखील रेफ्रिजरेटरध्ये कधीही ठेवू नये. आंबा फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील अँटीऑक्सिडंट्स कमी होतात. परिणामी, त्यातील पोषक घटक कमी होऊ लागतात.आणि त्याची चवही बिघडते.
लिची
लिची हे फार नाजूक आणि रसाळ फळ आहे. ते फ्रिजमध्ये ठेवल्याने ते आतून खराब होते आणि त्याची चव खराब होते. प्रत्येक फळ फ्रिजमध्ये ठेवणे योग्य मार्ग नाही. केळी, आंबा, लिची, एवोकॅडो, खरबूज आणि सफरचंद यांसारखी फळे खोलीच्या तापमानात अधिक निरोगी आणि चविष्ट राहतात. योग्य पद्धतीने फळे साठवल्याने त्यांचे पौष्टिक मूल्य टिकून राहतेच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List