अदानी… धारावी छोडो! तिरंगा यात्रेतून इशारा

अदानी… धारावी छोडो! तिरंगा यात्रेतून इशारा

स्वातंत्र्यलढय़ात महात्मा गांधी यांनी इंग्रजांना ‘भारत छोडो’ असा इशारा दिला होता. आज देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी तमाम धारावीकरांनी धारावी गिळंकृत करणाऱया उद्योगपती अदानी यांना ‘धारावी छोडो’चा इशारा दिला. धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे अशा मागणीचा यावेळी जोरदार पुनरुच्चार केला गेला.

धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने ‘धारावी जोडो तिरंगा यात्रा’ कुंभारवाडा नाक्यावरील बिस्मिल्ला हॉटेल येथून सुरू झाली आणि संविधान चौकातील अन्नवेल हॉटेलजवळ सांगता करण्यात आली.

धारावीकरांना बेदखल करून मुलुंड-देवनार-गोवंडी डंपिंग ग्राऊंडवर टाकण्याचे कारस्थान शिजले आहे, पण आम्ही सर्व धारावीकर एक आहोत आणि कोणीही धारावीबाहेर जाणार नाही हा एकतेचा संदेश या यात्रेतून देण्यात आला आहे, असे धारावी बचाव आंदोलनाचे प्रमुख नेते, माजी आमदार बाबुराव माने यांनी सांगितले. कुंभार समाजाला व्यवसाय करण्यासाठी जास्त जागा लागते. त्यामुळे कुंभारवाडय़ासाठी राज्य सरकारने मास्टर प्लॅन तयार करावा तसेच कोळीवाडय़ांचे सीमांकन करून कोळी बांधवांना न्याय द्यावा, असे यावेळी शेकापचे राजेंद्र कोरडे म्हणाले. तर धारावी बचाव आंदोलनाचा धसका घेतल्यामुळेच 12 ऑक्टोबरनंतर धारावीत घरांचे सर्वेक्षण होणार नसल्याचे अदानी कंपनीने जाहीर केले आहे, असे आंदोलनाचे अनिल कासारे म्हणाले.

शेकापचे राजेंद्र कोरडे, शिवसेना महिला उपविभागप्रमुख मंजू वीर, एकता असोसिएशनच्या इशरत खान, सपाचे रहिम मोटारवाला, समाजसेवक आझम जाला, कुसुम गौड, नसीरुल हक, शेकाप विद्यार्थी संघटनेच्या सौम्या कोरडे, आम आदमीचे राफेल पॉल, गौतमी जाधव, कृष्णा गायकवाड, संतोष तांबे, बसपाचे संजीवन जैस्वाल आदींसह असंख्य धारावीकर यात्रेत सहभागी झाले होते.

 धारावीतील सव्वा लाख झोपडपट्टीवासीय, दुकानदार, व्यावसायिकांचे धारावीतच पुनर्वसन करा, प्रत्येक झोपडपट्टीधारकास 500 चौरस फुटाचे घर द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सेलिब्रिटी पितात ते ‘अल्कलाइन वाटर’ काय असतं? सामान्य पाण्यापेक्षा वेगळं असतं का? किंमत जाणून धक्काच बसेल सेलिब्रिटी पितात ते ‘अल्कलाइन वाटर’ काय असतं? सामान्य पाण्यापेक्षा वेगळं असतं का? किंमत जाणून धक्काच बसेल
आपण सर्वांनीच ब्लॅक वॉटर पाणी किंवा अल्कलाइन वाटर हे नाव ऐकले असेल. जवळजवळ प्रत्येक सेलिब्रिटींच्या हातात या पाण्याची बॉटल आपण...
21 दिवस गव्हाची चपाती न खाल्ल्यास शरीरात काय होतात बदल? जाणून हैराण व्हाल
रामदेव बाबांनी मधुमेहावर सांगितला रामबाण उपाय, साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ फायदेशीर
युक्रेनियन संसदेच्या माजी सभापतींची अज्ञातांकडून गोळ्या घालून हत्या; हा आमच्या स्वातंत्र्यावर हल्ला, झेलेन्स्की यांचं वक्तव्य
Ratnagiri News – मुंबई-गोवा महामार्गाचा खडतर प्रवास! राजकारण्यांना सद्बुद्धी दे… अभिनेते प्रभाकर मोरे यांचे गणपतीला गाऱ्हाणे
धावत्या रेल्वेतून उतरला अन् थेट ट्रेनखाली गेला, RPF जवान आणि विक्रेत्याच्या तत्परतेमुळे वाचला तरुणाचा जीव
सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचा शेवटून पहिला नंबर, MOTN सर्वेक्षणातून माहिती समोर