वाळु माफियांची दादागिरी, तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
कोपरगाव येथील तहसील कार्यालयातील तहसिलदारसह महसूल पथकाला वाळु माफियांकडून शिवीगाळ, दमदाटी तसेच चापटीने मारहाण करून तुम्ही येथे नोकरी कशी करता आम्ही बघून घेतो. अशी धमकी दिली व शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना शनिवारी (दि.23) घडली. या घटनेच्या निषेर्धात तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि.26) रोजी सकाळी 10 वाजेपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे तहसील कार्यालयातील सर्व कामे ठप्प पडली आहेत.
तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येवून अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी यांना निवेदन पाठविले. सदर निवेदनाद्वारे सदरच्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक व्हावी तसेच किमान एक शस्त्रधारी पोलीस कर्मचारी पथकासोबत नियुक्त करावा. व पथकाला मा. जिल्हाधिकारी यांच्याकडील वरील नमूद परिपत्रकाप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अशी मागणी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या महसूल विभाग कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यामध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू आहे. विशेष म्हणजे सलग दोन वेळा महसूल पथकावरच हल्ला करण्याची घटना श्रीरामपूर, संगमनेर तालुक्यामध्ये घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर महसूल विभागाने काम बंद आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यामध्ये याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
वाळू माफियांना कोणाचे अभय
वाळूचा उपसा बंद केल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत एकीकडे वाळू मिळत नसल्यामुळे तसेच वाळू उपशाला पायबंद घातल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रकार जिल्ह्यांमध्ये या अगोदरही झालेले आहेत. महसूल मंत्र्यांच्या जिह्यात सलग घडलेल्या घटनेमुळे या वाळू माफियांना कोणाचे अभय आहे. त्यांचे धाडस कसे वाढले, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List