अहिल्यानगरमधील ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यांची पडताळणी

अहिल्यानगरमधील ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यांची पडताळणी

‘लाडकी बहिण योजने’त पात्र असणाऱ्या आणि आतापर्यंत शासकीय अर्थसाहाय्य घेणाऱ्या जिल्ह्यातील सव्वा लाख महिलांची यादी राज्य सरकारकडून महिला व बालकल्याण विभागाला पाठविण्यात आली आहे. या यादीची पुढील आठ दिवसांत पडताळणी करून अन्य शासकीय योजनांसह ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेतात की नाही, याची खातरजमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याणच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, यापूर्वीच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे 25 हजार महिलांची यादी पडताळणीसाठी देण्यात आली असून, चारचाकी वाहन नावावर असतानाही संबंधित महिलांनी ‘लाडकी बहीण योजने’चा आर्थिक लाभ घेतला असल्याचा संशय सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे या बहिणींसह आता 18 वर्षांखालील व 65 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या शासनाच्या अन्य योजनांसह ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेत असलेल्या सव्वा लाख महिलांची पडताळणी करण्यात येत असल्याचे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.

याबाबत महिला व बालकल्याण विभागाच्या मुख्य सचिवांकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील सव्वा लाख महिलांची यादी नगरला पाठविण्यात आली आहे. या यादीनुसार तालुकानिहाय गावपातळीवर अंगणवाडीसेविका, महसूल विभागाचे कर्मचारी आणि तालुकापातळीवर महिला व बालकल्याण अधिकारी यांच्या पातळीवरून या सव्वा लाख महिलांची खाते तपासणी सुरू करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत ही तपासणी पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यात चारचाकी वाहन नावावर असणाऱ्या 25 हजार आणि आता अन्य शासकीय योजनांसह ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोधाशोध सुरू करण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर 2024मध्ये ‘लाडकी बहीण योजने’ची घोषणा केल्यानंतर 11 लाख 50 हजार महिला योजनेत पात्र ठरविण्यात आल्या होत्या. या सर्वांना आतापर्यंत नियमितपणे महिन्याला दीड हजाराची आर्थिक मदत देण्यात येत आहे. मात्र, यांतील सव्वा लाख महिलांबाबत आता सरकारकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;