पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हिंदी भाषेत पूजा, पुजाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हिंदी भाषेत पूजा, पुजाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मराठी किंवा संस्कृत भाषेतून पूजा केली जाते. मात्र, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 30 ते 35 मराठी कुटुंब एकत्रित असताना देखील मंदिर समितीच्या पुजार्‍यांकडून हिंदीमध्ये पूजा केल्याचा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिक येथील एका भाविकाने केला. याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दखल घेतल्याने विठ्ठल मंदिरात हिंदी भाषेतून पूजा केल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. विठ्ठल भक्त राहुल सातपुते यांच्या तक्रारीची दखल घेऊन सदर मंदिर समितीच्या पुजार्‍यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे यांच्या उपस्थितीत सोमवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला देण्यात आले.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुकाराम भवान येथील श्री विठ्ठलाच्या तुळशी अर्चना पूजेवेळी राहुल सातपुते व त्याच्या कुटुंबातील किमान 30 ते 35 नागरिक सहभागी होते. एक कुटुंब वगळता इतर सर्व कुटुंब मराठी होते. परंतु, त्या एका परप्रांतीय कुटुंबाने तुळशी अर्चना पूजा हिंदीतून सांगावी अशी मागणी संबंधित पुजार्‍याकडे केली. त्यावेळी राहुल सातपुते यांनी आम्हाला हिंदी समजत नाही. माझ्या आई-वडिलांना हिंदी समजत नाही. पूजेत सहभागी झालेले सर्व कुटुंब मराठी आहेत. तरी आपण सर्व स्पष्टीकरण मराठीतून सांगा असे पुजार्‍याकडे मागणी केली. परंतु, सदर पुजार्‍याने त्यांची मागणी अमान्य करून पूजा हिंदीतून सांगितली आणि राहुल सातपुते व त्यांच्या कुटुंबीयांना अपमानित केले. सदर प्रकरण दुर्दैवी असून समितीच्या पुजार्‍यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. तसेच पुढील सर्व पूजा मराठीतूनच कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत हिंदी भाषेतून पुजा करणार्‍या पुजार्‍यावर तात्काळ कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी मंदिर समितीची राहील, असा इशारा मनसेच्या वतीने मंदिर समितीला मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;