खेडमध्ये भाविकांवर काळाचा घाला! टेम्पो दरीत कोसळून आठ जणींचा मृत्यू; 29 गंभीर जखमी पाईट-कुडेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

खेडमध्ये भाविकांवर काळाचा घाला! टेम्पो दरीत कोसळून आठ जणींचा मृत्यू;  29 गंभीर जखमी पाईट-कुडेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील पाईटजवळील प्रसिद्ध शिव कुंडेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त महिला भाविकांना दर्शनासाठी घेऊन जाणारा टेम्पो 30 फूट खोल दरीत कोसळल्याने आठ महिलांचा मृत्यू झाला, तर 29 महिला गंभीर जखमी झाल्या. पाईट ते कुंडेश्वर मंदिर रस्त्या दरम्यान असणाऱ्या घाटात वळणावर दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

पाईटजवळ शिव कुंडेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी दूरवरून भाविक येत असतात. पाईटजवळील पापळवाडी गावातील काही महिला दर्शनासाठी ऋषीकेश याच्या पिकअप टेम्पोतून कुंडेश्वर येथे निघाल्या होत्या. पाईट ते कुंडेश्वर मंदिर रस्त्या दरम्यान असणाऱ्या एका नागमोडी वळणावर टेम्पो चढावरून खाली घसरला. चालकाने ब्रेक दाबून गाडी थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र चालकाला टेम्पोवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले आणि रिव्हर्स येत टेम्पो रस्ता सोडून 30 फूट खोल दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच राजगुरूनगर तसेच महाळुंगे एमआयडीसी ठाण्याचे पोलीस तत्काळ घटनास्थळावर दाखल झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;