खडकवासल्यात काँग्रेसचे आजपासून चिंतन शिबीर

खडकवासल्यात काँग्रेसचे आजपासून चिंतन शिबीर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यस्तरीय दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन  खडकवासला येथे करण्यात आले आहे. हे शिबीर उद्यापासून (दि. 11) होणार असून, 12 ऑगस्टपर्यंत चालेल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हे शिबीर होणार आहे.

राज्यभरातील सुमारे 250 ते 300 काँग्रेस पदाधिकारी सहभागी होणार असून, पक्षाच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर चिंतन व आढावा घेण्यात येणार आहे. या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे, तत्त्वज्ञान आणि भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण काँग्रेस विभागांना या शिबिराचे यजमानपद देण्यात आले आहे. शिबिरामध्ये विविध विषयांवर सत्रं आयोजित केली जाणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;