छळाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
राखी पौर्णिमेला भावाला बोलविल्यास त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे आणि माहेरहून 20 लाख रुपये आणण्याच्या सासरच्या तगाद्याला पंटाळून उच्चशिक्षित विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 9 ऑगस्टला रात्री अकराच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक भागात घडली.
शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीसह सासरकडील नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्नेहा विशाल झेंडगे (27, रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे यांच्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कैलास मच्छिंद्र सावंत (55, रा. कर्देहळी, जि. सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List