विसर्जन मिरवणूक सकाळी साडेसातला सुरू करावी; पुणे शहर गणेशोत्सव समितीची मागणी

विसर्जन मिरवणूक सकाळी साडेसातला सुरू करावी; पुणे शहर गणेशोत्सव समितीची मागणी

लक्ष्मी रस्त्यासह सर्व मार्गावरील विसर्जन मिरवणुका सकाळी साडेसातला सुरू कराव्यात, अशी मागणी पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून विविध गणेश मंडळांनी सोमवारी केली. याबाबत मानाच्या गणपती मंडळांशी संवाद साधण्यात येणार आहे. मुख्य मिरवणूक नेहमीच्या वेळेनुसार सुरू होणार असेल, तर लक्ष्मी रस्त्यावरून अन्य मंडळांना मिरवणूक सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला.

पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून आयोजित या बैठकीस संजय बालगुडे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे, अंकुश काकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थकुडे, निंबाळकर तालीम मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश पवार, हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, भरत मित्रमंडळाचे बाळासाहेब दाभेकर, गरुड गणपती मंडळाचे सुनील कुंजीर, सेवा मित्रमंडळाचे शिरीष मोहिते, उदय महाले, नरेंद्र व्यवहारे, मनीष साळुंके, अजय दराडे, विनायक धारणे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. बालगुडे यांनी

नवे मार्ग सुरू करू !
‘सर्व गणेश मंडळांनी लक्ष्मी रस्त्याने जाण्याचा आग्रह धरू नये. ३०-३५ तास विसर्जन मिरवणूक हा वेळेचा अपव्यय आहे. पूर्वी ग्रामीण असलेला भाग महापालिकेत आल्याने आता शहरी झाला असून, तेथे आपल्यापेक्षा चांगला उत्सव होतो. लोकजागृती हा मूळ उद्देश कायम राहील, याची दक्षता घेतली पाहिजे. लक्ष्मी रस्त्याने आठ गणपती मंडळांना जाऊ दे. शहर वाढले असेल तर आपण नवे मार्ग सुरू केले पाहिजेत,’ याकडे श्रीकांत शिरोळे यांनी लक्ष वेधले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;